🏗कोंढवा खुर्द येथील 3 अनधिकृत इमारतीवर महापालिकेचा हतोडा; 10900 चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, January 14, 2020

🏗कोंढवा खुर्द येथील 3 अनधिकृत इमारतीवर महापालिकेचा हतोडा; 10900 चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले..

🏗कोंढवा खुर्द येथील 3 अनधिकृत इमारतीवर महापालिकेचा हतोडा; 10900 चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले..
कोंढवा खुर्द सर्वे नंबर 46, नफीसा अपार्टमेंट जवळील साई बाबानगर येथील तीन अनधिकृत इमारतीवर मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2020 रोजी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागा तर्फे कारवाई करण्यात आली आहे.

कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.महादेव कुंभार यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक पोलिस बंदोबस्तात कोंढवा खुर्द सर्वे नंबर 46, नफीसा अपार्टमेंट जवळील साई बाबानगर येथील 3 अनधिकृत इमारतीवर मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2020 रोजी महानगर पालिकेच्या बांधकाम विभागा तर्फे अनधिकृत बांधकामावर जॉ क्रशर मशीनच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत साधारण 10900 चौरस फूट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे. सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम करतेवेळी महानगर पालिकेच्या बांधकाम विभागाने नोटिसा देऊन बांधकाम निकशीत करण्यासाठी कळवण्यात आले होते. तथापि नोटीसीची दखल न घेता राजरोसपणे 6 मजल्याचे आर.सी.सीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते.
सदरची कारवाई,
पुणे महानगर पालिका अनधिकृत बांधकाम कार्यकारी अभियंता श्री.नामदेव गंभीरे यांच्या नियंत्रणाखाली झोन क्रमांक 2 बांधकाम विकास विभाग यांच्याकडून 1 मुकादम आणि 10 बिगारी यांनी 1 जॉ क्रशर मशीन, 2 जेसीपी ब्रेकर, 1 गॅस कटरच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

#

Pages