🚨डेबिट कार्डचे बनावट क्लोन कार्ड तयार करून रक्कम चोरणाऱ्या 4 परप्रांतीय चोरट्यांना सायबर पोलिसांनी केली अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, January 15, 2020

🚨डेबिट कार्डचे बनावट क्लोन कार्ड तयार करून रक्कम चोरणाऱ्या 4 परप्रांतीय चोरट्यांना सायबर पोलिसांनी केली अटक..

🚨डेबिट कार्डचे बनावट क्लोन कार्ड तयार करून रक्कम चोरणाऱ्या 4 परप्रांतीय चोरट्यांना सायबर पोलिसांनी केली अटक..

पुणे शहरामध्ये पेट्रोल पंपावर कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांच्या कार्डचे स्वापिंग करत ग्राहकांचे कार्डचा डेटा त्यांच्याकडिल स्कीमर द्वारे कॉफी करून घेत ग्राहक पिन नंबर टाकतांना तो पिन नंबर लक्षात ठेवून ग्राहकांना पेमेंट स्लिप न देता त्यावर पिन क्रमांक लिहून ती स्लिप स्वतःजवळ ठेवून बनावट कार्डद्वारे ग्राहकांच्या खात्यामधून पैसे चोरणाऱ्या 4 चोरट्यांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांन कडून 7 मोबाईल हँडसेट, 20 बनावट डेबिट कार्ड, 12 ओरिजनल वेगवेगळ्या बँकचे डेबिट कार्ड, ओळखपत्र, आधार कार्ड व रोख रक्कम 1230 रुपये असे ऐकूण मुद्देमाल हस्तगत करत अशा प्रकारचे 6 गुन्हे पुणे सायबर पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.

बनावट डेबिट कार्डचे क्लोन तयार करून चोरी करणारे आरोपी..
1) मिथुन अली (रा.गाव गौरीपूर,पोस्ट रसूलपुर, ठाणा चंचला, जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल)
2) नोयन शेख (रा. गाव गौरीपूर, पोस्ट रसूलपुर, ठाणा चांचला, जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल)
3) सईमुद्दीन रहेमान (रा. गाव गौरीपूर, पोस्ट रसुलपूर, ठाणा पांचला, जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल)
4) जुल्फिकार हुसेन (रा. गाव सिमला, पोस्ट महेंद्रपूर, ठाणा हरिष्चंद्रपुर, जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल. सध्या रा. वडगाव शेरी,पुणे)
यांस पुणे सायबर पोलिसांनी अटक करत माननीय न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 24 जानेवारी 2020 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुणे सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहरामधील नागरिकांच्या डेबिट कार्ड त्यांचेच ताब्यात असतांना त्यांच्या डेबिटकार्ड वरून एटीएम सेंटर मधून रक्कम काढलेल्या तक्रारी मागील 15 दिवसांमध्ये जास्त प्रमाणात येऊ लागल्याने साहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे, पोलीस हवालदार अस्लम आत्तार, पोलीस शिपाई अनिल पुंडलिक यांनी तक्रारी अर्जाचे विश्लेषण करून तक्रारदार नागरिकांनी पुणे कॅम्प परिसरातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्याचे निष्पन्न झाल्याने सोमवार दिनांक 13 जानेवारी 2020 रोजी पुणे सायबर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.गंगाधर घावटे, पोलीस हवालदार असलम आत्तार, पोलीस शिपाई अनिल पुंडलिक यांनी सदरच्या पेट्रोल पंपावर जाऊन चौकशी केली असता पेट्रोल पंपावर काम करणारे मिथुन अली (रा.गाव गौरीपूर,पोस्ट रसूलपुर, ठाणा चंचला, जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल), नोयन शेख (रा. गाव गौरीपूर, पोस्ट रसूलपुर, ठाणा चांचला, जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल), सईमुद्दीन रहेमान (रा. गाव गौरीपूर, पोस्ट रसुलपूर, ठाणा पांचला, जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल) हे तिघेही मागील 3 महिन्यापासून कामावर असून एकत्रित राहण्यास आहे तसेच ते तिघेही एकाच गावातील राहणारे असल्याने त्यांच्याबाबत संशय बळावल्याने त्या तिघांना ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी  केली असता त्यातिघांनी सांगितले की, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर येणारे नागरिक पेट्रोल भरल्यानंतर कार्डद्वारे पेमेंट करतात त्यांच्या कार्डचा डेटा व पिन नंबर पेमेंट स्लिप वर लिहून घेऊन डेबिट कार्डची माहिती व पिन नंबर ते त्यांचा आणखीन एक साथीदार जुल्फिकार हुसेन (रा. गाव सिमला, पोस्ट महेंद्रपूर, ठाणा हरिष्चंद्रपुर, जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल. सध्या रा. वडगाव शेरी,पुणे) यास देत असल्याची माहिती मिळाताच तात्काळ जुल्फिकार हुसेन, मिथुन अली, नोयन शेख, सईमुद्दीन रहेमान या आरोपींना ताब्यात घेत. आरोपींविरुद्ध पुणे सायबर पोलीस स्टेशन मध्ये गु.र.न 3/2020 भा.द.वि कलम 499,420सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 43/66,66(सी),66(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करत गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यातील अटक केलेल्या आरोपींकडून 7 मोबाईल हँडसेट, 20 बनावट डेबिट कार्ड, 12 ओरिजनल वेगवेगळ्या बँकचे डेबिट कार्ड, ओळखपत्र, आधार कार्ड व रोख रक्कम 1230 रुपये असा ऐकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अशा प्रकारचे आणखीन 6 गुन्हे अटक केलेल्या आरोपीकडून उघडकीस आले असून अटक केलेल्या आरोपींनी आणखीन किती बनावट डेबिट कार्ड तयार केले आहेत याबाबत तपास सूरू असून या आरोपींच्या फरार साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
माननीय न्यायालयात अटक केलेल्या आरोपींना हजर केले असता न्यायालयाने त्यांची दिनांक 24 जानेवारी 2020 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

आरोपी कार्डद्वारे अशाप्रकारे करायची चोरी..
अटक केलेला आरोपी हा जुल्फिकार हुसेन हा पूर्वी पेट्रोल पंपावर कामास असल्याने त्याने इतर आरोपींना पेट्रोल पंपावर काम देतो म्हणून सुमारे 3 महिन्यापूर्वी पुणे शहरात घेऊन आला व पेट्रोल पंपावर कामास लावले. आरोपी मिथुन अली, नोयन शेख, सईमुद्दीन रहेमान हे पेट्रोल पंपावर काम करत असतांना पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणारे नागरिक पेट्रोल भरल्यानंतर कार्डद्वारे पेमेंट करतात, ते करीत असतांना ते त्यांच्याकडील स्कीमर (कार्ड रीडर) ओरिजनल स्किमर सोबत धरून कार्ड स्वापिंग करत व ग्राहकांचे कार्डचा डेटा त्यांच्याकडे स्कीमर मध्ये कॉफी करून घेत. ग्राहक जेव्हा पिन नंबर टाकतांना तो पिन नंबर लक्षात ठेवून ग्राहकांना पेमेंट स्लिप न देता त्यावर पिन क्रमांक लिहून ती स्लिप स्वतःजवळ ठेवून ही माहिती आरोपी जुल्फिकार अहमद यांच्याकडे देत. त्यानंतर जुल्फिकार अहमद हा सदरची माहिती त्याचा दिल्ली येथील मित्र गुड्डू, रोहित (पूर्ण नाव पत्ता नाही) यांना देऊन बनावट कार्ड तयार करत.ल तयार झालेल्या बनावट कार्ड पैकी काही कार्ड आरोपींना त्यांच्यासाठी रक्कम काढण्यासाठी दिली जात.

पुणे सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की,
पेट्रोल पंपावर कोठेही कार्ड पेमेंट करीत असताना कार्ड स्वॅप करीत असतांना आपल्या कार्डचा पिन क्रमांक कोणी पाहत तर नाही ना !! याची खात्री करावी, तसेच प्रत्येक एक-दोन महिन्यामध्ये आपले सर्व कार्डचे पिन क्रमांक चेंज करावेत.
सदर दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पुणे सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे करीत आहेत.

सदरची कामगिरी,
पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री.अशोक मोराळे, पुणे शहर पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर गुन्हेशाखा श्री.संभाजी कदम, पुणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री.शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे, पोलीस कर्मचारी अस्लम आत्तार, मंगेश नांगरे, अनिल पुंडलिक, सौरभ घाटे, आदेश चलवादी, बाबासाहेब कराळे, आनंद भंडलकर यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages