🎆 महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन उस्तहात साजरा.... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, January 2, 2020

🎆 महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन उस्तहात साजरा....

🎆 महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन उस्तहात साजरा....

मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलिसांचे विशेष संचलनासह विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी पोलिसांचे शानदार संचलन आणि चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. अति.मुख्य सचिव संजयकुमार यांच्यासह राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा करतात :-
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांना 58 वर्षापूर्वी एका सोहळ्यात पोलीस ध्वज प्रदान केला. त्या दिवसापासून महाराष्ट्र पोलिसांना विशेष दर्जा मिळाला. त्यानिमित्त दर वर्षी 2 जानेवारी रोजी हा दिवस महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

आज मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मैदानात पोलिसांचे विशेष संचलन पार पडले. या संचलनात सुमारे 250 पोलीसांनी सहभाग घेतला. तसेच यावेळी पोलिसांच्या 200 जणांचा सहभाग असलेल्या बँड पथकाचे सादरीकरण करण्यात आले. तर अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारे होते, याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात आले.

पोलिसांचे संचलन आणि मानवंदना यांचा सन्मान स्वीकारण्याची संधी मिळाली हा आयुष्यातील अनमोल ठेवा असल्याचे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच पोलिसांचे प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा यासाठी जगातील सर्वोत्तम गोष्टी महाराष्ट्र पोलिसांना उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्यावतीने मुंबई पोलीस दलातील अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी मरोळ येथे बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतीगृह, क्रीडासंकुल यांच्यासह सर्व सुविधांयुक्त ४४८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यात तळमजल्यासह सात मजल्यांच्या सोळा इमारतींचा समावेश असेल. त्याचप्रमाणे या प्रकल्पासाठी सुमारे २२५ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

#

Pages