😱Body of a young girl found naked in a closed house in Kondhwa .. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, January 30, 2020

😱Body of a young girl found naked in a closed house in Kondhwa ..

😱कोंढवातील बंद सदनिकेत नग्नावस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह..

पुणे शहर कोंढवा परीसरात एमबीए झालेल्या तरुणीचा बंद सदनिकेमध्ये नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना उंड्री येथे बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणाची नोंद कोंढवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळेल, असे कोंढवा पोलिसांनी सांगितले आहे.

कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पूजा शेठ (34, रा. उंड्री) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती 2016 पासून उंड्री येथे रहात होती. तिने एमबीए केले असून यू.के. येथील कंपनीसाठी ऑनलाइन पद्धतीने घरुनच काम करते. तिचे मूळ गाव अहमदाबाद आहे. तिच्या वडिलांनी दि.26 जानेवारी रोजी तिच्याशी मोबाइलवर संपर्क केला होता. दरम्यान, त्यांनी बुधवारीही तिला कॉल केला असता, ती प्रतिसाद देत नव्हती. यामुळे वडिलांनी घरमालकाला कॉल करुन माहिती दिली. घरमालक सदनिकेवर गेल्यावर दरवाजा वाजवूनही तिने दरवाजा उघडला नाही. यामुळे त्याने त्याच्याकडील चावीने कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने आतून कडी लावल्याने दरवाजा उघडू शकला नाही. यामुळे घरमालकाने पोलिसांना बोलावले. कोंढवा पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, त्यांना बेडरुमध्ये फरशीवर ही तरुणी नग्नावस्थेत मृत आढळून आली. तिचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पूजा शेठ (34, रा. उंड्री) असे मृत तरुणी रहायला आल्यापासून तिच्या घरी मित्र-मैत्रिणी कोणाचीही ये-जा दिसली नाही. ती दिवस रात्र एकटीत दरवाजा लावून घरात काम करत असायची. कधीतरी जेवण बाहेरुन मागवले जात होते. यामुळे शेजारच्यांशीही तिचा परिचय नव्हता, असे कोंढवा पोलिसांनी सांगितले आहे.
सदर घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages