😱पुण्यात चंदगड अर्बन निधी बँकेच्या पीडित गुंतवणूकदारांनी बँकेचं कार्यालयच फोडलं... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, January 7, 2020

😱पुण्यात चंदगड अर्बन निधी बँकेच्या पीडित गुंतवणूकदारांनी बँकेचं कार्यालयच फोडलं...

😱पुण्यात चंदगड अर्बन निधी बँकेच्या पीडित गुंतवणूकदारांनी बँकेचं कार्यालयच फोडलं...

पुण्यात चंदगड अर्बन निधी बँकेनं लाखोंच्या कर्जाचं अमिष दाखवून गरजू खातेदारांना तब्बल 7 कोटींना चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित गुंतवणूकदारांनी पुण्यातलं या बँकेचं कार्यालयच फोडलं आहे. पुण्याच्या के.के मार्केट संकुलनातलं चंदगड अर्बन निधी बँकेचं ऑफिस सध्या बंद पडलं आहे. घोटाळा बाहेर आल्याने बँकेसमोर खातेदार जमले आणि त्यांनी बँकेच्या कार्यालयातच राडा घातला होता. खातेदारांना फसवणूक झाल्याचं लक्षात येताच सर्व खातेदार चिडले होते. बँक संचालक विठ्ठल पेडणेकर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

कर्ज मिळण्याच्या आशेपोटी या खातेदारांनी व्याजाने पैसे काढून बँकेची कर्ज पॉलिसी काढली होती. प्रत्येक खातेदारांन कडून अंदाजे 20 ते 40 हजार वसूल करून संचालक विठ्ठल पेडणेकर पळून गेल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. कोल्हापुरातही त्याने बँकेच्या संचालकाने अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचा आरोप खातेदारांनी केला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी बँक संचालक विठ्ठल पेडणेकर यांना तातडीने अटक करावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

या आधी पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा झाला होता. त्यात शेकडो खातेदारांची कोट्यवधींशी फसवणूक झाली होती. हे प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यातल्या या बँकेचा घोटाळा उघडकीस असल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली असून तातडीने कारवाईची मागणी होतेय.

पंजाब नॅशनल बँकेत नेमकं काय झालं ?
नीरव मोदी हा देशातील बड्या नेत्यांच्या वर्तुळात फिरणारा एक मोठा हिरा व्यापारी, त्यामुळे बँकांकडूनही त्याला नेहमीच रेड कार्पेट ट्रिटमेंट मिळायची, याचाच गैरफायदा घेत त्याने पंजाब नॅशनल बँकेकडून 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'ची सुविधा मिळवली.  ही 'लेटर ऑफ अंडरटेकिंग' नेमकी काय भानगड आहे ? तर लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे एक एका बँकेकडून दुसऱ्या बँकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी दिली जाणारी पतहमीच होय.
म्हणजे समजा संबंधीत कर्जदाराने त्या बँकांची कर्ज बुडवली तर लेटर ऑफ अंडरटेकिंग देणाऱ्या बँकेनं ती रक्कम चुकती करणं अपेक्षित असतं पण त्यासाठी ही पतहमी देणारी बँक संबंधीत खातेदाराकडून ठराविक अनामत रक्कमही स्वतःकडे ठेऊन घेत असते. थोडक्यात याच पतहमीच्या म्हणजेच लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या जोरावर नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांनी त्यांच्या नावावरील डायमंड आरएस, सोलर एक्सपोर्ट, स्टेलर डायमंडस या तीन कंपन्यांसाठी हाँगकाँगमधील अलाहाबाद बँक, अॅक्सिस बँकेतून पैसे मिळवले आणि 11 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेने बँकेला बुडवलं आहे.

Post Bottom Ad

#

Pages