😱पुण्यात पाषाण तलाव जवळ दोन नवजात बालकं आढळल्याने परिसरात खळबळ... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, January 14, 2020

😱पुण्यात पाषाण तलाव जवळ दोन नवजात बालकं आढळल्याने परिसरात खळबळ...

😱पुण्यात पाषाण तलाव जवळ दोन नवजात बालकं आढळल्याने परिसरात खळबळ...

पुणे शहरामध्ये दोन नवजात बालकं गुंडाळून टाकल्याचं आढळल्याचे धक्कादायक घटना समोर आलं आहे. या नवजात बालकामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असून त्यांना कपड्यामध्ये गुंडाळलेले होते. ही बालकं पाषाण तलावाजावळ आढळले आहेत. आज 14 जानेवारी सकाळी पोलिसांना माहिती मिळताच नवजात बालकांना तात्काळ नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून अधिक तपासणी सुरू आहे. ही नवजात बालकं सुमारे 1 दिवसांची असल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकारानंतर स्थानिक पोलिस अधिक तपास करत आहे.

काही महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे पुण्यामध्ये कचरा पेटीमध्ये महिलेला एक नवजात बालक आढळलं होतं. लाल रंगाच्या उशीच्या अभ्रकामध्ये एका काही हालचाल दिसल्याने तिने उशी उचलली त्यानंतर तिला त्यामध्ये बाळ असल्याचं समजलं.
दरम्यान आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या काही नागरिकांना ही बालकं दिसली. अचानक गोठडीमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने अनेकांचे तिथे लक्ष गेले. मग नागरिकांनी पोलिसांना या गोष्टीची माहिती दिली आहे.

Post Bottom Ad

#

Pages