🚨परदेशी महिलेकडून चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा कोंढवा पोलिसांनी केला पर्दाफाश.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, January 19, 2020

🚨परदेशी महिलेकडून चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा कोंढवा पोलिसांनी केला पर्दाफाश..

🚨परदेशी महिलेकडून चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा कोंढवा पोलिसांनी केला पर्दाफाश..

पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुशील धिवार यांनी दिलेल्या माहितीमुळे परदेशी महिलेकडून एका फ्लॅटमध्ये मुली ठेवून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. परदेशी महिलेच्या तावडीतून कोंढवा पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या पीडित मुलीची सुटका करत परदेशी महिलेला अटक केली आहे. दुसऱ्या देशातील महिलेने विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील कोंढवा परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

वेश्याव्यवसाय चालवणारी परदेशी महिला Nakibuule Salama हिला पोलिसांनी अटक करत कोंढवा पोलीस ठाण्यात 67/2020 इ.ट.पा कलम 3.4.5 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहरातील कोंढवा परिसरात शुक्रवार दि.17 जानेवारी 2020 रोजी 3:00 वा. सुमारास कोंढवा पोलीस ठाणेमधील गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सुशील धिवार कर्तव्यवर असतांना त्याच्या बातमीदाराकडून कोंढवा मधील शांतिकुंज इमारत,उंड्री,पुणे येथे एका फ्लॅटमध्ये काहीजण वेश्या व्यवसायासाठी मुली ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत स्वतःची उपजीविका चालवीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच त्वरित ही माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना कळवत त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे पोलीस नाईक सुशील धिवार यांनी कोंढवा येवलेवाडी येथील हॉटेल व्यावसायिक रोहन कामठे(वय 24, राहणार. येवलेवाडी,पुणे) यांस बनावट ग्राहक बनवून बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालला असल्याची खात्रीशीर माहिती घेत कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, उमेश कदम महिला पोलीस उपनिरीक्षक गिरी,पोलीस शिपाई रेगे, मोरे, चव्हाण, पोलीस नाईक सुशील धिवार, अमोल फडतरे यांच्या पथकाने पंचांच्या समक्ष छापा टाकत Nakibuule Salama या वेशाव्यवसाय चालवणाऱ्या परदेशी महिलेला पोलिसांनी अटक करत तिच्या तावडीतून वेशाव्यवसाय करणाऱ्या पीडित मुलीची सुटका केली आहे. Nakibuule Salama वेश्याव्यवसाय चालवणार्‍या परदेशी महिलेच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात 67/2020 इ.ट.पा कलम 3.4.5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार करत आहेत.

सदरची कामगीरी,
मा.अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनील फुलारी, मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.पोलीस सहा-उपायुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री.सुनील कलगुटकरकोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाडकोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे गुन्हे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक - संतोष शिंदे, उमेश कदम, महिला पोलीस उपनिरीक्षक गिरी, पोलीस शिपाई - रेगे, मोरे, चव्हाण, पोलीस नाईक - सुशील धिवार, अमोल फडतरे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages