🚨 मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी केली अटक... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, January 2, 2020

🚨 मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी केली अटक...


🚨 मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी केली अटक...

कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत कोंढवा पोलीस पेट्रोलिंग करत असतांना संशयितरित्या फिरणाऱ्या दोघांची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हे दोघे दुचाकी चोर असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडून कोंढवा,बिबवेवाडी,भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या अभिलेखा वरील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील एक आरोपी हा विधिसंघर्षग्रस्त बालक आहे.

दुचाकी चोरणारे आरोपी रोहित सुभाष चव्हाण (वय 19, रा. पिसोळी पुणे) व त्यांच्या समवेत आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालक साहिल परशुराम अहिवळे (रा. गोकुळ नगर,कोंढवा बुद्रुक,पुणे याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देत त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.) या दोघांनी स्वतःच्या मौजमजेसाठी पुणे शहरात विविध ठिकाणी वाहन चोरी केल्याचे कबुली दिली आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,
बुधवार दिनांक 1 जानेवारी 2020 कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाहनचोरी सारखे व इतर गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याकरिता पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना गुन्ह्याचे प्रमाण रोखण्याकरता वेळोवेळी पेट्रोलिंग करण्याबाबत तसेच गस्त घालण्याबाबत आदेशितनुसार कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलीस शिपाई आदर्श चव्हाण, किशोर वळे व उमेश शेलार यांना दोन मुले संशयास्पद वर्तन करताना आढळून आले याबाबत त्यांनी त्यास अडविले व त्यांच्याकडे दुचाकीची कागदपत्रांची मागणी केली असता ते गोंधळले व गाडीचे कागदपत्र आता आमच्याकडे नाहीत असे सांगू लागले त्यांच्याकडे संशय बळावल्याने त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर गाडी चोरी केली असल्याचे कबूल केले आहे. त्या दोघांना कोंढवा पोलीस ठाण्यात आणून अधिक विचारणा केली असता आरोपी रोहित सुभाष चव्हाण (वय 19, रा. पिसोळी,पुणे) व त्यांच्या समवेत आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालक साहिल परशुराम अहिवळे (रा. गोकुळ नगर,कोंढवा बुद्रुक,पुणे याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देत त्याला कुटुंबीयांकडे त्याला देण्यात आले आहे.) या दोन आरोपींनी स्वतःच्या मौजमजेसाठी पुणे शहरात विविध ठिकाणी वाहन चोरी केल्याचे कबुली देत कोंढवा पोलीस ठाणे अभिलेखा वरील चोरीची दुचाकी गाडी MH - 12 - FW - 1161 गुरन 980/19 भादवि कलम 379 मध्ये मिळून आली तसेच भारती विद्यापीठ पोलीस ठाणे कडील गुरन 676/19 दुचाकी - 1, बिबवेवाडी पोलीस ठाणे दाखल गुरन 345/19 दाखल गुन्ह्यात दुचाकी - 1 अशा चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

सदरची कामगिरी,
मा.अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनील फुलारी, मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.पोलीस सहा-उपायुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री.सुनील कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस शिपाई - आदर्श चव्हाण, किशोर वळे, उमेश शेलार यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages