😱पुण्यात एका कैद्याने रुग्णालयात गळफास घेऊन केली आत्महत्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, January 21, 2020

😱पुण्यात एका कैद्याने रुग्णालयात गळफास घेऊन केली आत्महत्या..

😱पुण्यात एका कैद्याने रुग्णालयात गळफास घेऊन केली आत्महत्या..

पुण्याच्या येरवडा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात अटक झालेल्या एका कैद्याने रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनील प्रजापती (वय २५) असे मृत कैद्याचे नाव आहे. सुनील प्रजापती पुण्याच्या येरवडा कारागृहात बंद होता. काही दिवसांपूर्वी सुनील प्रजापती याचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
आरोपी सुनील प्रजापती याला धारवाड येथील एका खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. आरोपी सुनील याचे पंधरा दिवसांपूर्वी मानसिक संतुलन बिघडल्याने त्याला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात असतांना सुनीलने अंगावर पांघरुण घेण्यासाठी देण्यात आलेली रझई फाडून त्या रझईचा दोर करून, गळफास घेऊन आत्महत्या केली.
सदर घडलेल्या घटनेचा पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहे.

Post Bottom Ad

#

Pages