🏆"पैलवान फाउंडेशन" तर्फे महाराष्ट्र केसरी पदक विजेते आणि महापौर यांचा सन्मान.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, January 22, 2020

🏆"पैलवान फाउंडेशन" तर्फे महाराष्ट्र केसरी पदक विजेते आणि महापौर यांचा सन्मान..

🏆"पैलवान फाउंडेशन" तर्फे महाराष्ट्र केसरी पदक विजेते आणि महापौर यांचा सन्मान..

रविवार दिनांक 19 जानेवारी 2020 रोजी "मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलन" कात्रज येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विविध वजनी गटातील पदक विजेत्यांना शाल, सन्मानचिन्ह, रोख रक्कम 5 हजार रुपये आणि फेटा बांधून गौरवण्यात आले आहे. त्याचबरोबर "खेलो इंडिया"मध्ये सुवर्णपदक पटकावणारा पैलवान श्री. सचिन दाताळ, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कास्यपदक संपादन करणारा पैलवान श्री. संग्राम बाबर, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकाची कमाई करणारा पैलवान श्री. धनंजय भिंताडे, लाल मातीचा राजा पुरंदर-केसरी पैलवान श्री. अनिकेत मांगडे यांनाही यावेळी विशेष करून गौरवण्यात आले आहे. तसेच पैलवानकिचा वसा आणि वारसा जोपासणारे पैलवान श्री. मुरलीधर (आण्णा) मोहोळ यांची पुण्यनगरीच्या महापौरपदी विराजमान झाल्या बद्दल या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे B.V.G ग्रुपचे CMD मा. श्री. हनुमंतराव गायकवाड आणि पैलवान फाउंडेशनचे पदाधिकारी यांच्यामार्फत चांदीची गदा, केसरी किताब व सन्मानचिन्ह देत सन्मानित करण्यात आले आहे.

पुण्याचे महापौर यांचे आश्वासन..
या कार्यक्रमात बोलताना "कुस्ती क्षेत्रातील मतभेद बाजूला ठेवून संकुलाचा विकास झाला पाहिजे त्यासाठी महापौर या नात्याने पुणे महानगरपालिकेतर्फे शक्य ती मदत केली जाईल" असे श्री. महापौर मुरलीधर (आण्णा) मोहोळ यांनी आश्वासन दिले आहे.

"पत्रा संकलन पेढीची" योजना राबवण्याचा संकल्प..
कार्यक्रमावेळी "पैलवान फाउंडेशनचे" संस्थापक पैलवान श्री. ज्ञानेश्वर माऊली मांगडे व पदाधिकारी यांनी वेळोवेळी "मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलन" कात्रज येथील गळक्या पत्रांसाठी पाठपुरवठा करून सुद्धा यश मिळत नसल्याने पैलवान पालक, माजी पैलवान, कुस्ती आश्रय दाते यांच्या मार्फत संकुलांसाठी "पत्रा संकलन पेढी" योजना राबवून जुना गळका पत्रा बदलण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार श्री. अशोकराव मोहोळ तसेच वस्ताद श्री.दत्तात्रय मोहोळ, पैलवान श्री. तात्यासाहेब भिंताडे, पैलवान श्री. आप्पा रेणुसे, पैलवान श्री. कुलदीप कोंडे, पैलवान श्री. विलास बलकवडे, डॉक्टर श्री. दत्ताजी कोहिनकर, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे पैलवान श्री. नरेंद्र मारणे, पैलवान श्री. धनंजय दगडे, पैलवान श्री. बालाजी गव्हाणे, पैलवान श्री. दीपक डोंगरे, पैलवान श्री. अशोक पवार, पैलवान श्री. उमेश दिघे, पैलवान श्री. महेश साठे, नगरसेवक श्री. युवराज बेलदरे, श्री. सुधीर कोंढरे, कुस्ती मार्गदर्शक पैलवान श्री. बाप्पू धुमाळ, NIS कुस्ती कोच पैलवान श्री. वरूण त्यागी, आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

Post Bottom Ad

#

Pages