🏃तंदुरुस्त भारत-फिट इंडियाचे मुंबईत पोलीस दलातर्फे मॅरेथॉनचे आयोजन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, January 21, 2020

🏃तंदुरुस्त भारत-फिट इंडियाचे मुंबईत पोलीस दलातर्फे मॅरेथॉनचे आयोजन..

🏃तंदुरुस्त भारत-फिट इंडियाचे मुंबईत पोलीस दलातर्फे मॅरेथॉनचे आयोजन..

महाराष्ट्र पोलीस दलातर्फे मुंबईत 9 फेब्वारी रोजी स्वस्थ आणि तंदुरुस्त हिंदुस्थान या मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये 5 हजारांपेक्षा अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभाग नॊंदवत धावणार आहेत. या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये देशातील ज्यांना कोणाला सहभागी व्हायचे आहे त्यांनी नक्की यावे, असे आवाहन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांनी केले आहे.

‘तंदुरुस्त भारत-फिट इंडिया’ या देशभर सुरू झालेल्या चळवळीचा भाग म्हणून मुंबईत पोलीस दलातर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस दलाचे आरोग्य आणि युवा पिढीचा आरोग्याकडे सकारात्मक दृष्टिकोन वाढावा हा मॅरेथॉन आयोजन करण्यामागचा हेतू असल्याचे जायसवाल यांनी सांगितले आहे. पोलीस दलातील आयरमॅन व अल्ट्रामॅन, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश हे या मॅरेथॉनच्या आयोजनाचे कामकाज पाहत आहेत. मॅरेथॉनपूर्वी तंदुरुस्तीचे व्यायाम, सराव व क्रीडाप्रकार करताना कुणालाही इजा, दुखापत होऊ नये यासाठी पोलीस दलाकडून देशभरातील दोन हजार फिजिओ थेरेपिस्ट तसेच 300 होमिओ पॅथिस्ट, आहारतज्ञ यांची सेवा मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र पोलिस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन या साइटवर लॉग इन करावे.

Post Bottom Ad

#

Pages