🗣निधीअभावी पिसोळी-उंड्री मुख्य रस्त्याचे काम रखडल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, January 25, 2020

🗣निधीअभावी पिसोळी-उंड्री मुख्य रस्त्याचे काम रखडल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन..

🗣निधीअभावी पिसोळी-उंड्री मुख्य रस्त्याचे काम रखडल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन..

पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रकल्प, योजनांसाठी राखीव असलेला कोटय़वधी रुपयांचा निधी अन्य कामांसाठी सर्रास वापरला जात असतांना काही किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे कोंढवा परिसरातील पिसोळी-उंड्री रस्त्यांचे विकसन रखडले असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याबाबत पिसोळी-उंड्री येथील ग्रामस्थांच्या वतीने आज धर्मावत पेट्रोल पंपासमोर रास्ता रोको आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शेख यांना निवेदन देण्यात आले आहे.

पुणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक राजेंद्र भिंताडे यांनी सांगितले की, सोलापूर महामार्गावरून शहरात जाणारी सर्व जड वाहतूक हडपसर-गाडीतळ-सासवड मार्गे वळवून मंतरवाडी चौकातून कात्रज बाह्यवळण मार्गावरून वळविल्याने या मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत आहे. त्यात जास्त प्रमाणात जड वाहनांचा समावेश आहे. हा मार्ग हांडेवाडी, उंड्री, पिसोळी या दाट लोकवस्तीतून जात असल्याने इतर वाहनांची वर्दळ सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होऊन वाहतूक कोंडी होत असल्याने येथील ग्रामस्थ व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे यावर उपाय म्हणून दिवसभर जड वाहनांना बंदी घालत रात्री 10 ते सकाळी 6च्या दरम्यान सुरु करण्याचे निवेदन भाषणातून वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांना करण्यात आले. यावेळी आंदोलनामध्ये अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले आहे.

पुणे शहरातील कोंढवा परिसरात पिसोळी-उंड्री या मुख्य रस्त्याचे काम दोन वर्षापासून संथ गतीने चालू आहे याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित विभागाशी पत्रव्यवहाराद्वारे विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी रस्ता बनवण्यासाठी पुणे महापालिकेकडे फंड उपलब्ध नसल्याचे धक्कादायक कारण सांगितले आहे. दोन वर्षापासून संथ गतीने चालू असलेल्या कामामुळे व अधिकाऱ्यांनी दिलेल्या कारणाने हा रस्ता किती महिन्यांनी किंवा किती वर्षांनी पूर्णत्वास येईल किंवा नाही या भीतीने मेथाकुठीस आलेल्या पिसोळी-उंड्री येथील ग्रामस्थांच्या वतीने आज धर्मावत पेट्रोल पंपासमोर रास्ता रोको आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शेख यांना निवेदन देण्यात आले, यावेळी शेख यांनी 15 दिवसाच्या आत मध्ये पिसोळी-उंड्री या मुख्य रस्त्याचे काम चालू करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

निधीबाबत पुणे महापालिकेचे स्पष्टीकरण..
महंमदवाडी, वडगावशेरी, कात्रज, वडगांव बुद्रुक, कोंढवा, बाणेर, बालेवाडी, संगमवाडी, पुणे रेल्वे स्थानक, कोरेगाव पार्क, कोथरूड, शिवाजीनगर, एरंडवणा, कर्वेनगर आदी भागातील एकूण ११९ रस्त्यांचे विकसन रखडले आहे. या रस्त्यांची आखणी पूर्ण झाली आहे. हे रस्ते पाचशे मीटर ते दीड-दोन किलोमीटर लांबीचे आहेत. मात्र हे रस्ते विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतरच त्यांच्या विकसनाची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

यावेळी, मा. जि.प.अध्यक्ष श्री.जालिंदर भाऊ कामठे, मा. सरपंच श्री.मच्छिंद्र दगडे, मा. उपसरपंच श्री.गणपत दगडे, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक श्री.राजेंद्रशेठ भिंताडे, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, कोंढवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.चंद्रकांत निंबाळकर, मा. सरपंच सौ.स्नेहल दगडे, मा. सरपंच श्री.सुभाष टकले, मा. सरपंच श्री.किरण येप्रे, श्री.सोमनाथ दगडे, मा. उपसरपंच श्री.दिपक धावडे, श्री.देविदास मासाळ, श्री.मोरेश्वर धावडे, युवा नेते श्री.आकाश टकले, श्री.लहू दगडे, श्री.विनायक धावडे यांच्यासह आंदोलनात सर्व ग्रामस्थ व परिसरातील नागरिक सहभागी होते.

Post Bottom Ad

#

Pages