🔥पुण्यात गॅस गळतीमुळे भीषण स्फोट.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, January 27, 2020

🔥पुण्यात गॅस गळतीमुळे भीषण स्फोट..

🔥पुण्यात गॅस गळतीमुळे भीषण स्फोट..
पुण्यातील खराडी येथे संभाजीनगरमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक दुर्घटना घडली आहे. या घटनेमध्ये सहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून आई वडील गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री घरातल्या गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच अग्निशमन दाखल होतच गॅसचा स्फोट होऊन लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलं आहे.
गॅस गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटांत 6 महिन्याची चिमुकली स्वराली भवाळे हीचा मृत्यू झाला असून वडील - शंकर भवाळे, आई - आशाबाई भवाळे हे स्फोटांमध्ये गंभीर जखमी झाले आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
पुण्यातील खराडी येथील संभाजीनगर परिसरात रविवारी रात्री भवाळे कुटुंब झोपल्यानंतर गॅस गळती सुरू होती. सकाळी उठल्यानंतर पाणी गरम करण्यासाठी गॅस लावला तर खूप मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे घराला आग लागली असून बाजूच्या घरांना तडे गेले असून परिसरातील घरांचे पत्रे उडाले आहेत. तसंच या स्फोटात सहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून घरातील झोपलेले लोक देखील गंभीर जखमी झाले आहे. या जखमी रुग्णामध्ये मृत्यू झालेल्या बाळाचे आई वडील देखील आहेत. या स्फोटातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Post Bottom Ad

#

Pages