🚨 जुगार अड्ड्यावर कोंढवा पोलिसांनी धडक कारवाई करत जुगाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, January 28, 2020

🚨 जुगार अड्ड्यावर कोंढवा पोलिसांनी धडक कारवाई करत जुगाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या..

🚨 जुगार अड्ड्यावर कोंढवा पोलिसांनी धडक कारवाई करत जुगाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या..

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोंढवा परिसरात अतिदक्षतेचा इशाराने कोंढवा पोलिसांची महत्त्वाच्या व गर्दीच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करत पोलीस ठाणे हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांनी आदेशीत केल्या नुसार पेट्रोलिंग करत असतांना पोलीस नाईक श्री.सुशील धिवार यांना त्यांच्या बातमीदार मार्फत शिवनेरी नगर गल्ली नंबर 12,महालक्ष्मी मंदिराजवळ,कोंढवा खुर्द येथे तीन पत्याचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मीळताच पोलिसांनी धडक कारवाई करत 7 जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 12 हजार 170 रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.

अवैधरीत्या पैशाने जुगार खेळणारे
1) विशाल मनोहर गायकवाड (वय 41, राहणार. कोंढवा,पुणे)
2) रामेश्वर दत्तात्रय कर्डिले (वय 29, राहणार. कोंढवा,पुणे)
3) संजय सिताराम साळवे (वय 40, राहणार. कोंढवा,पुणे)
4) रियान ईलियास मुजावर (वय 45, राहणार. मनीष पार्क,कोंढवा,पुणे)
5) परविन धोंडीबा कर्डिले (राहणार. कोंढवा,पुणे)
6) दिपक जगन्नाथ खराडे (वय 28, राहणार. कोंढवा,पुणे)
7) रशीद मुशिर खान (वय 57, राहणार. कोंढवा,पुणे) यांना अटक करत कोंढवा पोलिस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम 12अ प्रमाणे गु.र.न 90/2020 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
रविवार 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या रोजी कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी आदेशीत केल्या नुसार पेट्रोलिंग करत असतांना पोलीस नाईक सुशील धिवार यांना त्यांच्या बातमीदार मार्फत कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत शिवनेरी नगर गल्ली नंबर 12,महालक्ष्मी मंदिराजवळ,कोंढवा खुर्द येथे तीन पत्याचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर बातमी मीळताच. सदरची माहिती लागलीच कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक व पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांना कळवत त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाडकर, पोलीस नाईक सुशील धिवार, पोलीस नाईक पाटोळे, पोलीस शिपाई किरण मोरे, पोलीस शिपाई जडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकून अवैधरीत्या पैशाने जुगार खेळणारे 1) विशाल मनोहर गायकवाड (वय 41, राहणार. कोंढवा,पुणे), 2) रामेश्वर दत्तात्रय कर्डिले (वय 29, राहणार. कोंढवा,पुणे), 3) संजय सिताराम साळवे (वय 40, राहणार. कोंढवा,पुणे), 4) रियान ईलियास मुजावर (वय 45, राहणार. मनीष पार्क,कोंढवा,पुणे), 5) परविन धोंडीबा कर्डिले (राहणार. कोंढवा,पुणे), 6) दिपक जगन्नाथ खराडे (वय 28, राहणार. कोंढवा,पुणे), 7) रशीद मुशिर खान (वय 57, राहणार. कोंढवा,पुणे) यांना जुगार खेळतांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 12 हजार 170 रुपये रोख रक्कम हस्तगत करत कोंढवा पोलिस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम 12अ प्रमाणे गुरन 90/2020 अन्वये गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई,
श्री.सुनील फुलारी मा.अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांचे सूचनेप्रमाणे मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.साहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री.सुनील कलगुटकर, मा.कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, मा.कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक श्री.विष्णू वाडकर, पोलीस नाईक श्री.सुशील धिवार, पोलीस नाईक श्री.पाटोळे, पोलीस शिपाई श्री.किरण मोरे, पोलीस शिपाई श्री.जडे यांच्या पथकाने केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages