🚨जबरी चोरीतील आरोपीला पोलिसांनी अहमदाबाद येथून केली अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, January 29, 2020

🚨जबरी चोरीतील आरोपीला पोलिसांनी अहमदाबाद येथून केली अटक..

🚨जबरी चोरीतील आरोपीला पोलिसांनी अहमदाबाद येथून केली अटक..

पिंपरी चौकातील मेन रोडवर सोने व्यवसायिकाची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेत चोरट्यांनी सोन्याच्या 400 ग्रॅम वजनाच्या 4 लाख रूपयांच्या मोरणी व विक्रीची रोख रक्कम 2 लाख 80 हजार रुपये असे एकूण 6 लाख 80 हजार रुपये चोरून नेल्याचा गुन्ह्याचा पिंपरी तपास पथकातील पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेत अहमदाबाद येथून अटक करून सखोल चौकशी केली असता अजून एक गुन्ह्याची आरोपीकडून उकल झाली आहे.

आरोपी रोहित उर्फ काळू दलपत घमंडे (वय 30) यास पिंपरी पोलिसांनी अटक करून 210 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या मोरणी हस्तगत करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
सोने व्यावसायिक रवी अमिचंद मेहता (वय 71,  राहणार. अजनाला जिल्हा, अमृतसर राज्य,पंजाब) हे आपल्या जवळ सोन्याच्या मोरण्या घेऊन त्याची विक्री,पंजाब,राजस्थान,गुजरात व महाराष्ट्र येथील सोने व्यवसायिक दुकानदाराकडे जाऊन अनेक राज्यांमध्ये फिरून सोन्याच्या मोरणी विकण्याचा व्यवसाय करत असतात. बुधवार दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी 10:15 वाजण्याच्या सुमारास त्यांच्याजवळील सोन्याच्या 400 ग्रॅम वजनाच्या 4 लाख रूपयांच्या मोरणी व विक्रीची रोख रक्कम 2 लाख 80 हजार रुपये असे एकूण 6 लाख 80 हजार रुपये असलेली बॅग घेऊन पिंपरी चौक येथील मेन रोड वरून चालत जात असतांना पाठीमागून दुचाकीवर दोघेजण येऊन पाठीमागे बसलेल्याने त्याच्या खांद्याला अडकवलेली बॅग जोरात हिसका मारून जबरदस्तीने पळवून घेऊन गेले. आरोपींनी जोरदार धक्का दिल्याने रवी मेहता खाली पडून गंभीर जखमी झाले. या घटनेप्रकरणी रवी मेहता यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पिंपरी पोलीस ठाण्यात येथे अज्ञात इसमा विरोधात गु.र.न 1215/2019 भा.द.वि कलम 392,34 अन्वये जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन गुन्हे शाखेतील तपास पथकने तपास करत असतांना घटनास्थळावरील,आधी राहत असलेल्या लॉज व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व मेन रोडवरील सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपीचा येरवडा पर्यंत माग काढून सर्व सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून फुटेजमधील इसमाचे फोटो महाराष्ट्र क्राईम डिटेक्शन ग्रुप व नॅशनल क्राइम डिटेक्शन ग्रुप तसेच इतर व्हॉट्सऍप ग्रुपवर आरोपीची माहिती दिली. तपास पथकने याबाबत अधिक प्राप्त माहिती करून आरोपी हे गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील असावेत असा संशय व्यक्त केल्याने गुजरात राज्यातील गुन्हे शाखेच्या सुरत अहमदाबाद व राजस्थानातील येथील पथकाशी संपर्क साधून आरोपी विषयी सविस्तर माहिती देण्यात आली होती. गुजरात गुन्हे शाखेच्या बातमीदारकडून आरोपीं हे अहमदाबाद येथील असल्याची माहिती मिळताच. सहाय्यक पोलिस आयुक्त श्री.आर.आर.पाटील, श्रीधर जाधव, विशेष तपास पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस कर्मचारी महादेव जावळे,सोमनाथ बोराडे,नितीन खैसे,विशाल भोईर,कबीर पिंजारी,पंकज बदाने यांच्या पथकाने गुजरात येथील अहमदाबाद शहरात जाऊन बातमी दाराकडून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने अहमदाबाद येथील छारा नगर,कुबेर नगर येथे छापा मारून आरोपी रोहित उर्फ काळू दलपत घमंडे (वय 30) यास ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत गुन्हामध्ये चोरलेल्या मालापैकी 210 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या मोरणी हस्तगत करण्यात आल्या आहेत. गुन्ह्यात सामील असलेल्या आरोपी साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. सदर आरोपींस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी 3 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अशाप्रकारे आरोपींनी केली चोरी..
फिर्यादी रवी मेहता हे सोन्याच्या मोरणी विकण्यासाठी अहमदाबाद येथे गेले असतांना त्यातील आरोपी व त्यांचे चार साथीदारांनी फिर्यादीच्या बाबत माहिती घेत फिर्यादीचा अहमदाबाद येथून पाठलाग करत पिंपरी येथे आले होते. आरोपी येरवडा येथे राहत होते. फिर्यादी राहत असलेल्या पिंपरी येथील रत्ना लॉजचे बाहेर आरोपी दोन दिवस सलग पाळत ठेवून होते. आरोपीनी गुन्हा केला त्यादिवशी आरोपी व त्यांच्या साथीदारांनी फिर्यादी यांना लॉजमधील रुममध्ये जाऊन लुटण्याचा प्लॅन करून त्यांच्यापैकी एक जण लॉज मध्ये जाऊन फिर्यादीची खोली पाहून आला होता. परंतु फिर्यादी हे रूममध्ये नसल्याने त्यांना लुटण्याचा प्लॅन फेल गेला. त्यानंतर फिर्यादी हे त्यांच्या जवळील सोन्याच्या मोरणी व रोख रक्कम एका बॅगमध्ये घेऊन जात असतांना आरोपी आणि त्यांचे चार साथीदारांनी मिळून पिंपरी चौक येथून बँग जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली असल्याचे उघड झाले आहे.

तपासादरम्यान झाली दुसऱ्या गुन्ह्यांची उकल..
सदर तपासादरम्यान अटक आरोपी यांच्याकडे तपास करता त्याने व त्याचे साथीदार यांनी दिनांक 24 डिसेंबर 2019 रोजी डेक्कन होंडाच्या समोर पिंपरी येथे मित्राकडून उसने पैसे घेऊन मुलाची शाळेची फी भरण्यासाठी जात असलेल्या एका ब्रेझा गाडी चालकास तुमच्या गाडीचा धक्का लागला आहे असे सांगून त्यास थांबवून त्याला गाडीतून खाली उतरून त्याच्याशी हुज्जत घालून मागे असलेल्या साथीदारांनी गाडीची डाव्या बाजूची काच फोडून सीटवर तीन लाख रुपये ठेवलेली निळ्या रंगाची बॅग जबरदस्तीने चोरून नेल्याची कबुली दिल्याने पिंपरी पोलीस ठाणे गु.र.न 1216/2019 भादवि कलम 379, 427, 34 अन्वय दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी फिर्यादी समीर थापर (राहणार. मोशी) यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी रोहित उर्फ काळू दलपत घमंडे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या साथीदारांन विरोधात राजस्थान, गुजरात, हैदराबाद, औरंगाबाद येथे एकूण 5 गुन्हे दाखल असून तो राजस्थान येथील जबरी चोरीचा गुन्हा मध्ये फरार होता.

सदरची कारवाई,
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री.संदीप बिष्णोई, सहाय्यक पोलीस आयुक्त अप्पर पोलीस आयुक्त श्री.रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्री.सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.आर.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस.आय.टी. तपास पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष सावंत, पोलिस कर्मचारी मंगेश गायकवाड,संतोष अस्वले,सोमनाथ बोराडे,कबीर पिंजारी,विशाल भोईर,महादेव जावळे,नितीन खैसे,पंकज भदाने,प्रवीण पाटील यांनी केली आहे.


Post Bottom Ad

#

Pages