😱भामट्याचा पुणे सायबर विभागातील पोलीस अधिकाऱ्यांनाच गंडा घालण्याचा प्रयत्न... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, January 8, 2020

😱भामट्याचा पुणे सायबर विभागातील पोलीस अधिकाऱ्यांनाच गंडा घालण्याचा प्रयत्न...

😱भामट्याचा पुणे सायबर विभागातील पोलीस अधिकाऱ्यांनाच गंडा घालण्याचा प्रयत्न...

पुणे सायबर विभागातील पोलिस अधिकाऱ्यांना चक्क एका भामट्याने फोन करून ऑनलाईन खरेदी केल्यामुळे 12 लाखांची 80 हजाराची मोटार बक्षीस लागली असल्याचे सांगून. मोटार हवी का रोख रक्कम, असे विचारूणा करून कागदपत्रांसह पैशाची मागणी करत गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे सायबर विभाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शिवाजीनगर येथील सायबर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गंगाधर घावटे यांना एक भामट्याने फोन करून तुम्ही ऑनलाइन खरेदी केल्यामुळे कंपनीकडून तुम्हाला बक्षीस म्हणून 12 लाख 80 हजार रुपयांची मोटार देण्यात येणार आहे. मोटार अथवा रोख पैसे मिळवू शकतात यासाठी आधार कार्ड, बँकेचे डिटेल्स व फोटो असे आलेल्या मोबाईलच्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवण्यास सांगितले. बक्षीस हवे असल्यास काही रक्कम खात्यामध्ये जमा करण्यासाठी सांगून रायगड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे खोटे सांगत होता पण त्याला रायगड जिल्ह्यातील गावाचे नाव ही सांगता येत नव्हते. गंगाधर घावटे यांनी त्याच्याकडून सर्व माहिती काढून घेत सायबर विभागात पोलीस अधिकारी असल्याचे सांगितल्यानंतर भामटा गडबडला व त्याने लगेच फोन बंद केला.

पुणे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.गंगाधर घावटे यांनी नागरिकांना केले आव्हान..
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. वेगवेगळ्या प्रकारे बक्षीस लागल्याचे सांगून बँक अकाऊंटची माहिती घेतात व एकदा बँक डीटेल्सची माहिती मिळताच बँक खात्यातील रक्कम हडप करण्याचे प्रकार सायबर भामटे करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह महिला व मोठ-मोठ्या व्यवसायिकांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लागलेल्या बक्षिसांच्या कॉलवर विश्वास न ठेवता यापासून सावध रहा, असे आवाहन पुणे सायबर विभाग पोलीस निरीक्षक श्री.गंगाधर घावटे यांनी केले आहे.

Post Bottom Ad

#

Pages