😱पुण्यात जीममध्ये तरुणीचे मोबाईलवर छायाचित्र काढल्याबाबत जाब विचारणाऱ्या तरुणीला मारहाण करीत केला विनयभंग.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, January 6, 2020

😱पुण्यात जीममध्ये तरुणीचे मोबाईलवर छायाचित्र काढल्याबाबत जाब विचारणाऱ्या तरुणीला मारहाण करीत केला विनयभंग..

😱पुण्यात जीममध्ये तरुणीचे मोबाईलवर छायाचित्र काढल्याबाबत जाब विचारणाऱ्या तरुणीला मारहाण करीत केला विनयभंग..

पुण्यात जीममध्ये व्यायामासाठी येणाऱ्या तरुणीचे मोबाईलवर छायाचित्र काढल्याबाबत तरुणाला जाब विचारणाऱ्या तरुणीला मारहाण करीत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सिंहगड रस्ता परिसरामध्ये शनिवारी घडली. याप्रकरणी तरुणा विरुद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या घटने प्रकरणी 26 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यावरुन अभिजीत पराडकर (वय 29, रा. आंबेगाव) याच्याविरुद्ध विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,
सिंहगड रस्त्यावरील मोहिते प्लाझा या इमारतीमध्ये गोल्ड जीम आहे. या जीममध्ये फिर्यादी तरुणीने जीम लावली आहे. त्याच ठिकाणी पराडकर यानेही जीम लावली होती. दरम्यान, पराडकर याने त्याच्या मोबाईलमध्ये फिर्यादी तरूणीच्या नकळत तिचे छायाचित्र काढले. हा प्रकार तरुणीच्या मैत्रिणीने तिला सांगितले. त्यामुळे तरुणीने पराडकर याला माझे छायाचित्र का काढले, असा जाब विचारला. त्यावेळी पराडकर याने मीच फोटो काढले, तुला काय करायचे ते कर, अशा शब्दात तरुणीला अश्‍लिल भाषा वापरली. तसेच तरुणीच्या चारित्र्यावरही संशय घेतला. दोघांमध्ये वाद वाढल्यानंतर पराडकर याने तरुणीच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन गुन्हा दाखल केला.
सदर घटनेचा पुढील तपास सिंहगड पोलिस करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages