🔥पुण्यातील बाणेरमधील पॅनकार्ड क्लब इमारतीच्या डोमला भीषण आग... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, January 6, 2020

🔥पुण्यातील बाणेरमधील पॅनकार्ड क्लब इमारतीच्या डोमला भीषण आग...


🔥पुण्यातील बाणेरमधील पॅनकार्ड क्लब इमारतीच्या डोमला भीषण आग...

पुण्यातील बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लबच्या इमारतीवरील डोमला आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेत संपूर्ण डोम आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. जवळपास ४० ते ५० फूट उंच इमारती वरील या डोमला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान आगी मागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पुण्यातील बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लबची ही इमारत सर्वात मोठी आहे. या इमारतीमधूनच राज्यभरातील पॅनकार्डचा व्यवहार केला जातो. पण गेल्या काही दिवसांपासून ही इमारत बंद होती. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी न झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शॉर्ट सर्किटमुळे आग ?
दरम्यान आगीमुळे आसपासच्या परिसरात धुराचे लोळ उठले आहेत. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी चारही बाजूंनी इमारतीला घेराव घातला. मात्र आगीवर अद्याप नियंत्रण मिळवता आलेले नाही. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Post Bottom Ad

#

Pages