🚨 गुन्हयातील मुद्देमाल आपापसात वाटून घेतांना कोंढवा पोलिसांनी छापा टाकून दोन गुन्हेगारांना केली अटक... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, January 4, 2020

🚨 गुन्हयातील मुद्देमाल आपापसात वाटून घेतांना कोंढवा पोलिसांनी छापा टाकून दोन गुन्हेगारांना केली अटक...


🚨 गुन्हयातील मुद्देमाल आपापसात वाटून घेतांना कोंढवा पोलिसांनी छापा टाकून दोन गुन्हेगारांना केली अटक...

कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकातील पोलीस शिपाई जोतीबा पवार गस्त घालत असतांना गुन्ह्यातील संशयित दोन इसम पारगेनगर कोंढवा,पुणे येथील मोकळ्या जागेत झुडपात बसुन गुन्हयातील मुद्देमाल आपापसात वाटून घेत असलेची गोपनीय माहीती मिळताच त्या ठिकाणी छापा टाकून दोन गुन्हेगारांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

गुन्ह्यातील मुद्देमाल आपापसात वाटून घेणारे आरोपी आफताप राजु सत्तार पठाण (वय १९, रा.शिवनेरीनगर,कोंढवा,पुणे), शाहारूक सैफान शेख (वय 21, रा.इशरत बाग,पुणे) यांना कोंढवा पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,
शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी पुणे शहर हद्दीत वाहनचोरी सारखे व इतर गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याकरिता पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांनी गुन्हे शाखा मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वेळोवेळी पेट्रोलिंग व गस्त घालण्याबाबत आदेशित केल्यानुसार कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकातील पोलीस शिपाई जोतीबा पवार गस्त घालत असतांना गुन्ह्यातील संशयित दोन इसम पारगेनगर कोंढवा,पुणे येथील मोकळ्या जागेत झुडपात बसुन गुन्हयातील मुद्देमाल आपापसात वाटून घेत असलेची गोपनीय माहीती मिळताच ही माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांना कळवत त्यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे तपास पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस हवालदार नाईक, पोलीस नाईक साळुंखे, वनवे, पोलीस शिपाई वळे, शेलार व कोंढवा चौकी बिट पोलीस शिपाई जडे, शिंदे यांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे त्याठिकाणी छापा टाकून गुन्ह्यातील मुद्देमाल आपापसात वाटून घेणारे आरोपी आफताप राजु सत्तार पठाण (वय १९, रा.शिवनेरीनगर,कोंढवा,पुणे), शाहारूक सैफान शेख (वय 21, रा.इशरत बाग,पुणे) यांना ताब्यात घेवुन सखोल चौकशी केली असता. आरोपींनी गुन्ह्या केल्याची कबुली दिली. कोंढवा पोलीस ठाणे गु.र.नं 09/2020 भा.द.वि.कलम 454, 457, 380 प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेला 9510/- रुपये किंमतीचा माल त्याच्याकडुन हत्तगत करून गुन्हा उघडकिस आणला आहे.

सदरची कामगिरी,
मा.अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रदेशीक विभाग श्री.सूनिल फुलारी, मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5 श्री.सुहास बावचे, मा.सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे श्री.सुनील कलगुटकर, मा.कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे कोंढवा तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस हवालदार संतोष नाईक, पोलीस नाईक वणवे, कळंबे, सुशिल धिवार, पोलीस शिपाई आदर्श चव्हाण, किशोर वळे, उमेश शेलार, अमित साळुके, जोतीबा पवार कोंढवा चौकी बिट माशेँल पोलीस शिपाई जडे शिंदे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages