🐕मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी..नागरिकांची लाल रंगाच्या पाण्याच्या बाटलीची अनोखी शक्‍कल... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, January 24, 2020

🐕मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी..नागरिकांची लाल रंगाच्या पाण्याच्या बाटलीची अनोखी शक्‍कल...

🐕मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी..नागरिकांची लाल रंगाच्या पाण्याच्या बाटलीची अनोखी शक्‍कल...

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर कोणतेच प्रयत्न केले जात नसल्याचे लक्षात येत असल्यामुळे नागरिकांनी दारांशी लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या ठेवण्याची अनोखी शक्‍कल लढविली जात आहे. कुत्र्यांचा जाच कमी व्हावा व घरात बरकत नांदावी यासाठी लोकांनी हा शॉर्टकट शोधला असला तरी ही अज्ञानातून पसरवलेली अंधश्रध्दा असून यात कोणतेही तथ्य नसल्याचे अंधश्रध्दा निर्मूलन समितीने म्हटले आहे.

सध्या पुणे शहरातच नव्हे तर राज्यातील अनेक भागांत बऱ्याचशा गावांत घरापुढे लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या दिसून येतात. विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्‍या पुणे शहरात चांगल्या चांगल्या मोठ्या बंगल्यांसमोर हे चित्र सध्या पाहवयास मिळत आहे. या बाटल्यांमध्ये कुंकूमिश्रित पाणी टाकून या बाटल्यांची मांडणी प्रवेशव्दाराजवळ किंवा घराच्या कुंपणाजवळ केली जाते. या बाटल्या का ठेवल्या जातात याची विविध कारणे सांगितली जात आहेत.

घरापुढे कुत्री,मांजरे, डुकरे आदी प्राणी घाण करतात. त्यामुळे परिसर अस्वच्छ दिसतो. कुत्री व डुकरे लाल रंगाला घाबरतात किंवा समोर मानवी प्रतीकृती उभी असावी असे या प्राण्यांना वाटते. तसेच काही महिलांच्या मते कुंकूमिश्रित पाणी मांगल्याचे प्रतिक मानतात. यामुळे घरातील वातावरण मंगलमय राहते व व्यवसायात बरकत राहते,अशी भावना आहे.

मात्र,यासंदर्भात कोणतीही चिकित्सा न करता लोक अज्ञानातून अंधश्रध्देतून अनुकरण करीत असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे. कुत्र्यांना रंगज्ञान नसते. या पाण्यात रसायन असेल तर कुत्रे लांब जातील असेही काही घडत नसते. आम्ही प्रात्यक्षिक करून पाहिले यात काही तथ्य नसल्याचे अंधश्रध्दा निर्मूलन समिती यांनी सांगितले आहे.

Post Bottom Ad

#

Pages