😱 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना मातोश्री वर भेटीसाठी जाण्यार्या शेतकरी वडील आणि लहान मुलीला पोलिसांनी घेतले ताब्यात... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, January 5, 2020

😱 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना मातोश्री वर भेटीसाठी जाण्यार्या शेतकरी वडील आणि लहान मुलीला पोलिसांनी घेतले ताब्यात...


😱 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना मातोश्री वर भेटीसाठी जाण्यार्या शेतकरी वडील आणि लहान मुलीला पोलिसांनी घेतले ताब्यात...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकरी वडील आणि त्यांच्या लहान मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पनवेलवरून वांद्रे येथील मातोश्री येथे आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोघंही आज दुपारी १२ च्या सुमारास मातोश्रीवर जाण्याच्या प्रयत्नात होते. आपल्या शेताच्या लोन संदर्भात झालेला गैरप्रकार सांगण्यासाठी ते रविवारी ‘मातोश्री’वर आले होते अशी प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेले शेतकरी आणि त्यांची मुलगी दोघंही पनवेल येथे वास्तव्यास असल्याचं समजतंय. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी त्यांनी ‘मातोश्री’त प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले आणि ताब्यात घेतले.
‘मातोश्रीवर आलेल्या त्या शेतकऱ्याला पोलिसांना सोडण्यास सांगितले आहे, तसेच त्यांचे काय काम आहे याबाबत विचारपूस करण्यास सांगितले आहे’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Post Bottom Ad

#

Pages