🚨तोतया रॉ अधिकाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, January 12, 2020

🚨तोतया रॉ अधिकाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद..

🚨तोतया रॉ अधिकाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद..

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये एडमिनल एस पी रॉ आधिकारी असल्याचे सांगत बुधवार दि.15 जानेवारी 2020 रोजी "दानापूर ते पुणे एक्सप्रेसने बिहार येथून पुण्यामध्ये हत्यार सप्लाय होणार आहे." अशी खोटी माहिती देणाऱ्या रॉ अधिकाऱ्याला कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी आय कार्डची मागणी केली असता त्याचा खोटारडेपणा समोर येताच कोंढवा पोलिसांनी जेरबंद करत सखोल चौकशी केली असता. तोतया रॉ अधिकाऱ्याने तालुका रफिगंज,जिल्हा औरंगाबाद,राज्य बिहार याठिकाणी रुपयांच्या लालसेपायी मित्रांच्या मदतीने एकाची हत्या करून फरार झाला असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

तोतया रॉ आधिकारी सोनू सुरज तिवारी (वय 26, राहणार. लक्ष्मीनगर, गल्ली नंबर 8, कोंढवा बुद्रुक, पुणे. मूळचा - मुक्काम पोस्ट कासम,तालुका रफिगंज,जिल्हा औरंगाबाद,राज्य बिहार)  यास गु.र.नं कलम 43/2020 भा.द.वि कलम 417,419 प्रमाणे कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये शनिवार दि.11 जानेवारी 2020 रोजी दुपारी 2:00 वाजण्याच्या सुमारास कोंढवा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक अमोल फडतरे यांना एक इसम पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये टेहळणी करत उभा असल्याचे दिसून आला. त्यास 'तुम्ह या पे क्यू आहे हो' असे विचारले असता. सदर इसमाने 'मै अखंड कुमार शुक्ला हु..मै एडमिनल एस पी अधिकारी हू..फिलहाल मै रॉ के लिए काम करता हु' असे सांगितले. त्या इसमास 'आपको किस्से मिलना है' अशी विचारणा केली असता. एडमिनल एस पी रॉ आधिकाऱ्याने सांगितले की, बुधवार दि.15 जानेवारी 2020 रोजी "दानापूर ते पुणे एक्सप्रेसने बिहार येथून पुण्यामध्ये हत्यार सप्लाय होणार आहे." यासंदर्भात मला तुमच्या साहेबांना भेटायचे आहे. एडमिनल एस पी रॉ आधिकाऱ्याने सांगितलेली हकीकत गंभीर स्वरूपाची असल्याने त्यास कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांची भेट घेत त्यांना सर्व हकीकत सांगितली. एडमिनल एस पी रॉ आधिकाऱ्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी 'तुम काम क्या करते हो और तुम्हारा आयडी कार्ड दिखाओ' अशी विचारणा केली असता. एडमिनल एस पी रॉ आधिकाऱ्याने आयकार्ड नाही आहे असे सांगत उडवा उडवीचे उत्तरे देत व असमाधानकारक उत्तरे देऊ लागला. संशयित इसम सोनू सुरज तिवारी (वय 26, राहणार. लक्ष्मीनगर, गल्ली नंबर 8, कोंढवा बुद्रुक, पुणे. मूळचा - मुक्काम पोस्ट कासम,तालुका रफिगंज,जिल्हा औरंगाबाद,राज्य बिहार) याच्या बोलण्यावरून व हावभाव वरून रॉ एजंट असल्याचे खोटे सांगत असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता त्याने तोतया रॉ अधिकारी असल्याची कबुली दिली तसेच  त्याच्या पाकिटामध्ये खाकी वर्दीतील  अधिकारी वेषातील त्याचा फोटो मिळून आला आहे. यास गु.र.नं कलम 43/2020 भा.द.वि कलम 417,419 प्रमाणे कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

सदर घटनेचा पुढील तपास,
कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विष्णू वाडकर करत असतांना तोतया रॉ अधिकारी सोनू सुरज तिवारी (राहणार. मूळचा - मुक्काम पोस्ट कासमा,तालुका रफिगांज,जिल्हा औरंगाबाद,राज्य बिहार) याने याठिकाणी रुपयांच्या लालसेपायी मित्रांच्या मदतीने एकाची हत्या करून फरार झाला असल्याची धक्कादायक माहिती औरंगाबाद पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.

सदरची कामगिरी,
मा.अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनील फुलारी, मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.पोलीस सहा-उपायुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री.सुनील कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाडकर, पोलीस नाईक अमोल फडतरे व पोलीस शिपाई चव्हाण यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages