⚖ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुणे कोर्टाकडून समन्स... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, January 7, 2020

⚖ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुणे कोर्टाकडून समन्स...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुणे कोर्टाकडून समन्स...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुणे कोर्टाकडून समन्स बजावण्यात आला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून भारताचा उल्लेख हिंदुस्तान असा केल्याने पुणे कोर्टाकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर कोर्टाने दोघांनाही समन्स बजावला आहे.
सामनामधून वारंवार भारताचा उल्लेख हिंदुस्थान असा केला जातो. यावर पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी आक्षेप घेत पुणे न्यायालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. पुणे न्यायालयाने सोमवारी ही याचिका दाखल करून घेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांना समन्स बजावला आहे. या दोघांनाही 11 फेब्रुवारीला पुणे न्यायलायात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हेमंत पाटील यांनी पंधरा दिवसांपूर्वी ही याचिका दाखल केली होती.
एकीकडे असं असताना दुसरीकडे मोठ्या कष्टाने तयार झालेल्या ठाकरे सरकारला पहिल्या दिवसांपासूनच नाराजीचं ग्रहण लागलं आहे. हे ग्रहण काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीये. आज राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या पहिल्याच बैठकीत काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दांडी मारलीय. खाते वाटपात कमी महत्त्वाचं खातं मिळाल्यामुळे वडेट्टीवार नाराज असल्याची चर्चा आहे. ही नाराजी व्यक्त करण्यासाठीच ते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहिले नाहीत असं बोललं जातंय. या आधी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही राजीनामा दिल्याचं सांगितलं जात होतं. मात्र नंतर त्यांचं मन वळविण्यात आलं होतं. तीन पक्षांचं सरकार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजांचं मन वळविण्यासाठी जास्त शक्ती खर्चा करावी लागेल अशी शक्यता व्यक्त केलीय जातेय.
खातेवाटपात विजय वडेट्टीवारांना इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन ही खाती मिळाली होती. विरोधी पक्ष नेते राहिलेले वडेट्टीवार हे काँग्रेसचे विदर्भातले महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे आपल्याला चांगलं खातं मिळावं अशी त्यांची इच्छा होती. सगळ्याच पक्षांमधल्या नेत्यांनी चांगल्या खात्यांसाठी दबाव टाकल्याने खातेवाटप रखडलं होतं.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या डिग्रीचा वाद :-
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन काही दिवस जात नाहीत तोवरच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे अडचणीत सापडले आहेत. कारण सामंत यांच्या डिग्रीबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. उदय सामंत यांनी ज्या विद्यापीठातून इंजिनिअरींगची डिग्री घेतली होती, त्या विद्यापीठाला सरकारची मान्यता नसल्याचा आरोप करत पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभिषेक हरदास यांनी सावंत यांची डिग्री बोगस असल्याचं म्हटलं आहे.

Post Bottom Ad

#

Pages