😱 घरगुती गॅस सिलिंडरच्या लेपनासाठी वापरण्यात येणारे रसायन आरोग्यासाठी धोकादायक... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, January 7, 2020

😱 घरगुती गॅस सिलिंडरच्या लेपनासाठी वापरण्यात येणारे रसायन आरोग्यासाठी धोकादायक...

😱 घरगुती गॅस सिलिंडरच्या लेपनासाठी वापरण्यात येणारे रसायन आरोग्यासाठी धोकादायक...

घरगुती गॅस सिलिंडरच्या लेपनासाठी (कोटिंग) रसायनांचा वापर करण्यात येत असून या रसायनांमुळे कर्करोग होण्याचा धोका वर्तवणारी जनहित याचिका विचारात घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला दिले.

पलादिन पेंटस् आणि केमिकल्स कंपनीने जनहित याचिका करत घरगुती गॅस सिलिंडरच्या लेपनासाठी वापरण्यात येणारे रसायन आरोग्यासाठी धोकादायक असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. घरगुती गॅस सिलिंडरच्या लेपनासाठी झिंक क्रोमेट वापरण्यात येते. त्यात मोठय़ा प्रमाणावर विषारी द्रव्य असून या द्रव्यामुळे कर्करोगाचा धोका संभवतो, असा दावाही कंपनीने केला होता. एलपीजी गॅस हे मूलभूत उत्पादन आहे आणि प्रत्येक घरात त्याचा वापर होतो. त्यामुळेच हा धोका टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच घरगुती गॅस सिलिंडरच्या लेपनासाठी झिंक क्रोमेटचा वापर करण्यावर बंदी घालण्याची मागणी कंपनीने याचिकेद्वारे केली होती.

न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचवेळी याचिकाकर्त्यांच्या या प्रस्तावावर आणि त्यात उपस्थित करण्यात आलेल्या धोक्यांबाबत तातडीने आवश्यक तो निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले.

Post Bottom Ad

#

Pages