🚨प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांची मोठी कामगिरी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, January 25, 2020

🚨प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांची मोठी कामगिरी..

🚨प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांची मोठी कामगिरी..

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुणे शहर कोंढवा परिसरात गस्तीवर असलेल्या कोंढवा पोलीस नाईक - योगेश कुंभार पृथ्वीराज पांडुळे यांनी संशयित रित्या भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करून अवैधरित्या हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक करून त्याच्याकडून 15 प्लास्टिकचे कॅडमध्ये 525 लिटरची 30 हजार रुपयांची तयार हातभट्टीची दारू व 75 हजार रुपये किंमतीची मारुती ओमनी चार चाकी गाडी असे एकूण 1 लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे यांनी फिर्याद दिली आहे.

अवैद्य दारू वाहतूक करणारा आरोपी प्रदिप सुधाकर जाधव (वय 28 रा. गोकुळनगर,कात्रज,कोंढवा रोड) यास कोंढवा पोलिस ठाण्यात 87/2020 मुंबई प्रोहिबिशन कायदा कलम 65 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात दारू विक्रीवर बंदी असल्याने अवैध मार्गाने दारूविक्री करत मलिदा गोळा करण्याच्या इराद्याने आरोपी दारूची अवैधरित्या साठवणूक करत विक्री करीत असल्याने तसेच पोलीस स्टेशन हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या सूचनेनुसार कोंढवा तपास पथकाचे पोलिस नाईक - योगेश कुंभार, पृथ्वीराज पांडुळे हे पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असतांना येवलेवाडी याठिकाणी शनिवार दिनांक 25 जानेवारी 2020 रोजी सकाळी 04.30 वाजण्याच्या सुमारास एक संशयीत लाल रंगाची मारुती ओमानी गाडी येवलेवाडी कडून टिळेकर नगरकडे भरधाव वेगात घेऊन जात असल्याचे दिसल्याने त्या ओमनी गाडीवर संशय बळावल्याने पोलिस नाईक योगेश कुंभार व पृथ्वीराज पांडुळे यांनी मार्शलच्या मदतीने मारुती ओमनी चारचाकी गाडीचा पाठलाग करून टिळेकर नगर येथे गाडी थांबवून तपासणी केली असता संशयित इसम प्रदिप सुधाकर जाधव (वय 28 रा. गोकुळनगर,कात्रज,कोंढवा रोड) हा अवैद्य रित्या दारू वाहतूक करीत असल्याचे मिळून आला. कोंढवा पोलिसांनी प्रदीप जाधव यास ताब्यात घेत त्याच्याकडून 15 प्लास्टिकचे कॅडमध्ये 525 लिटरची 30 हजार रुपयांची तयार हातभट्टीची दारू व 75 हजार रुपये किंमतीची मारुती ओमनी चार चाकी गाडी असे एकूण 1 लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत कोंढवा पोलिस ठाण्यात 87/2020 मुंबई प्रोहिबिशन कायदा कलम 65(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे करीत आहेत.

सदरची कामगिरी,
मा. श्री.सुनील फुलारी सो अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. श्री.सुहास बावचे सो.पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5, मा. श्री.सुनील कलगुटकर सो.सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे, मा. श्री.विनायक गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस ठाणे, मा. श्री.महादेव कुंभार पो. नि. गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे सहायक पोलिस निरीक्षक श्री.दिपक बर्गे, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक श्री.संतोष शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार श्री.इक्बाल शेख, पोलीस नाईक - श्री.योगेश कुंभार, श्री.पृथ्वीराज पांडुळे, श्री.सरगर, श्री.मांढरे, पोलीस शिपाई श्री.अजीम शेख, पोलीस हवलदार श्री.राणे यांच्या पथकाने केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages