👌ऑटो रिक्षाचालकांच्या प्रामाणिकपणामुळे व कोंढवा पोलिसांच्या सहकार्याने हरवलेली लॅपटॉप बॅग आली मिळून.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, January 22, 2020

👌ऑटो रिक्षाचालकांच्या प्रामाणिकपणामुळे व कोंढवा पोलिसांच्या सहकार्याने हरवलेली लॅपटॉप बॅग आली मिळून..

👌ऑटो रिक्षाचालकांच्या प्रामाणिकपणामुळे कोंढवा पोलिसांच्या सहकार्याने हरवलेली लॅपटॉप बॅग आली मिळून..

पुणे शहरात घोरपडी पेठ ते कोंढवा असा प्रवास करीत असतांना प्रवाशाने आपली लॅपटॉपची बॅग ऑटो रिक्षामध्ये विसरले होते, परंतु ऑटो रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे व कोंढवा पोलिसांच्या सहकार्याने हरवलेली लॅपटॉप बॅग काही तासातच शोधून प्रवाशाला दिल्याची घटना पोलीस ठाण्यात घडली आहे. हरवलेली बॅग शोधून परत दिल्याने रिक्षाचालक व कोंढवा पोलिसांचे सर्वस्तरातून तसेच प्रवासी वर्गात कौतुक केले जात आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की,
रिक्षाचालक अब्दुल रहमान मुल्ला (राहणार. चिंतामणी नगर,हडपसर,पुणे) यांनी घोरपडी पेठ ते कोंढवा याठिकाणाचे प्रवासी भाडे घेत कोंढवा याठिकाणी प्रवाशाला सोडल्यानंतर काही अंतर पुढे गेल्यानंतर दुसरे प्रवासी घेतले असता प्रवासाने पाठीमागील सीटवर एक बॅग असल्याचे रिक्षाचालकाला निदर्शनास आणून दिल्याने रिक्षाचालक अब्दुल रहमान मुल्ला यांनी क्षणाचा विलंब न करता कोंढवा पोलीस ठाण्याच्या अंकित पोलीस चौकीत जाऊन कोंढवा पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस हवालदार विठ्ठल जाधव पोलीस शिपाई सचिन कळसाईत यांना घडलेल्या प्रकाराची माहिती देत हरवलेली लॅपटॉप बॅग पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलीस हवालदार विठ्ठल जाधव व पोलीस शिपाई सचिन कळसाईत यांनी घडलेल्या घटनेची माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना कळवत त्यांनी  केलेल्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे ताब्यात असलेली लॅपटॉप बॅगची काळजीपूर्वक तपासणी केली असता त्यामध्ये एक लॅपटॉप व बॅगेच्या पाऊच मध्ये एक मोबाईल क्रमांक आढळून आला. या मोबाईल क्रमांकावर पोलीस हवालदार विठ्ठल जाधव यांनी संपर्क करत चौकशी केली असता तो मोबाईल क्रमांक हा लॅपटॉप बॅग मालक अली अजगर रामपूरवाला (राहणार. ब्रह्मा ॲवेन्यू,कोंढवा खुर्द,पुणे) याचे असल्याचे निष्पन्न झाल्या नंतर त्यांना कोंढवा पोलीस चौकी येथे बोलावून त्यांची खात्रीशीर माहिती पटवून घेत लॅपटॉप व लॅपटॉपची बॅग त्यांच्या स्वाधीन केली आहे.

ऑटोरिक्षा प्रवाशाला त्याची हरवलेली लॅपटॉप बॅग व लॅपटॉप सुखरूप परत मिळाल्याने त्याने प्रामाणिक रिक्षाचालक अब्दुल रहमान मुल्ला व कोंढवा पोलिसांचे खूप खूप आभार मानले आहेत.

या घटनेप्रकरणी प्रामाणिक ऑटोरिक्षा चालक कोंढवा पोलिसांचे सर्व स्तरातून प्रवासी वर्गात कौतुक केले जात आहे.

Post Bottom Ad

#

Pages