😱राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाकिस्तानातील मुसलमानांची भलतीच काळजी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, January 24, 2020

😱राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाकिस्तानातील मुसलमानांची भलतीच काळजी..

😱राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाकिस्तानातील मुसलमानांची भलतीच काळजी..
पाकिस्तानात हिंदू अत्यंत हालाकीचे जीवन जगत असल्याचे वारंवार समोर येत असते. त्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्यांक का झाले असा सवाल सर्वत्र विचारला जात असताना खा. शरद पवार यांना पाकिस्तानातील मुसलमानांची भलतीच काळजी असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.भारतातल्या नातेवाईकांना भेटण्याची पाकिस्तानच्या मुस्लिमांची इच्छा आहे. मात्र, ते मुस्लीम असल्याने त्यांना भारतात येण्यास परवानगी मिळत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
क्रिकेट क्षेत्रात काम करत असताना मी पाकिस्तानमध्ये बैठकीला गेलो होतो. तेव्हा असे अनेक लोक मला भेटले की, त्यांचा एकतरी नातेवाईक भारतात आहे. त्यांची मनापासून इच्छा आहे की, त्यांच्या नातेवाईकांसोबत भेटीगाठी व्हाव्यात. पण केवळ ते मुस्लीम आहेत म्हणून त्यांना भारतात येण्यास परवानगी नसल्याचे पवार म्हणाले. पाकिस्तान,बांग्लादेश या देशात हिंदूंची अत्यंत दयनीय स्थिती असल्याचे विविध रिपोर्ट्समधून समोर येत आहे मात्र त्यावरही बोलतील अशी अपेक्षा असताना पवार यांना त्या ठिकाणी असणाऱ्या मुसलमानांची जास्त काळजी असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, भाजप हा मुस्लिमांचा सर्वात मोठा शत्रू असून भाजपला सत्तेपासून रोखण्याचा मुस्लिम बांधवांचा आग्रह असल्यानेच आम्ही शिवसेनेसोबत महाराष्ट्रातील सत्तेत सहभागी झालो, असं विधान सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलं होतं. यावरून चर्चा सुरू असताना खा. शरद पवार यांनी एकप्रकारे चव्हाण यांच्या वक्तव्याला पुढे बोलताना पुष्टी दिली.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर शिवसेनेसोबत जायला हरकत नाही असं मत अल्पसंख्यांक प्रतिनिधींनी मांडल्यानंतरच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसोबत हातमिळवणी करून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे.
विधानसभा निवडणुकांमध्ये अल्पसंख्याक समुदायाने राज्यात भाजपला मतदान केलं नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या मुंबईत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अल्पसंख्याक समुदायाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युतीही चालली असं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार मधेही शिवसेनेबरोबर युती करण्याबाबत यावेळी सूचना मागवण्यात आल्याबद्दल अल्पसंख्याक प्रतिनिधींनी स्वागत केलं असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येत आहोत असं सांगत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले मात्र आता सत्तेत येण्यामागे नेमकी काय करणे होती याचा उलगडा होऊ लागला आहे.

Post Bottom Ad

#

Pages