😱लुडो गेम डाउनलोड करून दे असे म्हणत जवळीक साधत अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे... - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, January 7, 2020

😱लुडो गेम डाउनलोड करून दे असे म्हणत जवळीक साधत अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे...


😱लुडो गेम डाउनलोड करून दे असे म्हणत जवळीक साधत अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे...

वाकडमध्ये 11 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पीडित मुलीला अज्ञात नाराधमाने लुडो गेम डाउनलोड करून दे असे म्हणत जवळीक साधली. त्यानंतर पीडित मुलीने भावाला गेम डाउनलोड करून देण्यास सांगितला. अज्ञात आरोपीने त्यानंतर आपण लपाछपी खेळू असे सांगून अंधाराचा फायदा घेत अल्पवयीन मुलीबरोबर लौंगिक चाळे केले आहे. अद्याप आरोपीला पोलीसांनी अटक केली नाही आहे. वाकड पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
रविवारी रात्री नऊ च्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी, भाऊ आणि आणखी मुलीसह ते राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळत होते. तेव्हा तिथे अज्ञात 22 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला मोबाईलमध्ये लुडो गेम डाउनलोड करून दे अस म्हणत जवळीक साधली. पीडित मुलीने तिच्या भावाला गेम डाउनलोड करण्यास सांगितला. ते सर्व झाल्यानंतर अज्ञात आरोपी तरुणाने आपण लपाछपी खेळू असे तिथे असलेल्या मुलांना म्हणाला. अंधाराचा फायदा घेत 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक चाळे केले आणि तो तिथून फरार झाला.

दरम्यान, रात्री उशिरा 11 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने संबंधित घटना आई ला सांगितली. पीडित मुलीच्या आईने वाकड पोलिसात जाऊन अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सदर घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मडके करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages