🚨शाळेच्या परिसरातून अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा डाव पोलिसांनमूळे फसला; पोलिसांनी तीन संशयितांना केली अटक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, January 9, 2020

🚨शाळेच्या परिसरातून अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा डाव पोलिसांनमूळे फसला; पोलिसांनी तीन संशयितांना केली अटक

🚨शाळेच्या परिसरातून अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा डाव पोलिसांनमूळे फसला; पोलिसांनी तीन संशयितांना केली अटक

शाळेच्या परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून निघालेल्या संशयितांच्या मुसक्‍या पोलिसांनी वेळीच आवळल्याने अपहरणाचा डाव फसला. याप्रकरणी सातारा मधील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारे संशयित ज्ञानेश्‍वर चव्हाण, अमित कुलकर्णी, अभिजीत शिंदे (सर्व रा. उस्मानाबाद) यांस अटक केली आहे.

शाहूपुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार,
बुधवार सकाळी पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षाचा फोन खणाणला आणि साताऱ्यातील एका शाळेच्या परिसरातून पांढऱ्या रंगाच्या कारमधून एका मुलीचे अपहरण केल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी प्रचंड वेगाने हालचाली गतिमान करून शहरात नाकाबंदी केली. शहरातील विविध भागांतून पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत फिरू लागल्याने नक्की काय झाले, याची माहिती घेण्यासाठी लोकांनी गर्दी करण्यास सुरूवात केली. यावेळी शहर वाहतूकच्या एका कर्मचाऱ्याने मोती चौकात अपहरण करणाऱ्यांना पकडले. त्यानंतर पोलिसांच्या गाड्या गजबजलेल्या मोती चौकात धडकल्या. एका कारमधून अपहरण करून जाणाऱ्या संशयितांना अपहरण झालेल्या मुलीसह पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर संशयितांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेत त्यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मोती चौकात शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ताब्यातील सर्व संशयितांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सदर घटनेचा पुढील तपास शाहूपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages