😱राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या नगरसेविका बदनामी प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, January 29, 2020

😱राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या नगरसेविका बदनामी प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

😱राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या नगरसेविका बदनामी प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या नगरसेविका व त्यांच्या पतींचा बदनामीकारक व्हिडिओ बनवत वायरल केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा खुर्द प्रभाग क्रमांक २७ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका परवीन शेख व त्यांचे पती हाजी फिरोज शेख यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने बदनामीकारक व्हिडिओ बनवत वायरल केल्याप्रकरणी नगरसेविका परवीन शेख यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

नगरसेविका व त्यांच्या पतीची बदनामी केल्याप्रकरणी गगन एमराल्ड सोसायटीचे अध्यक्ष हनीफ शेख, रहिवासी - इरफान मुलांणी, अख्तर पिरजादे, नसरीन माला, शरिफा, इरशाद शेख यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात १००/२०२० व गू.र.न. कायदा कलम ५०९ व ५०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,
मंगळवार दिनांक २८ जानेवारी २०२० रोजी पुणे कोंढवा खुर्द प्रभाग क्रमांक २७ राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या नगरसेविका परवीन फिरोज शेख (वय ४५, राहणार. अशोक म्यूज सोसायटी,कोंढवा खुर्द,पुणे) व त्यांचे पती हाजी फिरोज शेख हे सोशल फाउंडेशनचे संस्थापक असून फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत. शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका परवीन शेख व त्यांचे पती हाजी फिरोज शेख यांची अपमानकारक व प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने एक व्हिडीओ क्लिप विविध व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित करण्यात आली होती. गगन एमराल्ड सोसायटी कोंढवा पुणे येथील सोसायटीच्या जागेबद्दल वाद होता त्यामध्ये आमचा काहीही संबंध नसताना व्हिडिओमध्ये नगरसेविका व त्यांचे पती यांचे फोटो दाखवून, कशा प्रकारे बिल्डरचे दलाल व पतीच्या साह्याने बिल्डरचे खिसे कसे भरत आहेत असा ३ मिनिट १३ सेकंदाचा व्हिडिओ वायरल केला होता. रविवार दिनांक १५ मे २०१९ रोजी वायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर मला मानसिक धक्का बसल्याने माझ्या पतीनी मला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या गगन एमराल्ड सोसायटीच्या जागेशी नगरसेविका परवीन शेख व त्यांचे पती हाजी फिरोज शेख यांचा काहीही संबंध नसताना भ्रष्टाचारी, दलाल व बेकायदेशीर कृत्य करून फायदा मिळवत असल्याचे दाखवून अपमानित व प्रतिमा मलीन करून बदनामी केल्याप्रकरणी गगन एमराल्ड सोसायटीचे चेअरमन हनीफ शेख, रहिवासी - इरफान मुलांणी, अख्तर पिरजादे, नसरीन माला, शरिफा, इरशाद शेख यांच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गू.र.न. कायदा कलम ५०९ व ५०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे तपास करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages