😱बॉलिवूड अभिनेत्री शबाना आजमी यांच्या कारला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, January 18, 2020

😱बॉलिवूड अभिनेत्री शबाना आजमी यांच्या कारला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात..

😱बॉलिवूड अभिनेत्री शबाना आजमी यांच्या कारला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात..
बॉलिवूड अभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात शबाना आजमी यांना दुखापत झाली असून त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात शबाना आजमी सुरक्षीत असून त्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
शबाना आजमी या आपल्या खासगी कारमधून मुंबई येथून पुण्याच्या दिशेने निघाल्या होत्या. दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. सुट्टी साजरी करण्यासाठी त्या खंडाळा येथे निघाल्या होत्या. अपघातात त्यांच्या नाकाला आणि तोंडाला दुखापत झाल्याची माहिती आहे. खालापूर टोलनाक्याजवळ आल्यावर त्यांच्या कारने रस्त्याच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला आहे.
शबाना आजमी यांच्या सोबत कारचालक आणि आणखी एक व्यक्ती असे मिळून तीघेजन कारने प्रवास करत होते. आजमी यांच्या कारचा चालक आणि त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही.
शबाना आजमी यांचे पती जावेद अख्तर यांचा 75 वा वाढदिवस नुकताच पार पडला. गेली तीन दिवस हा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात होता. त्यासाठी विविध पार्टी, प्रदर्शन आणि कार्यक्रमांचे आयोजन केले होते. खास करुन जावेद अख्तर यांच्या वाढदिवसानिमित्त शबाना आजमी यांनी आयोजित केलेल्या एका पार्टीला आमिर खान, दीपिका पादुकोण, किरण राव यांच्यासह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमांनतर शबाना आजमी पुण्याला निघाल्या होत्या. दरम्यान, त्यांच्या वाहनाला अपघात झाला आहे.

Post Bottom Ad

#

Pages