😱 Shocking..25 thousand child porn uploads in 5 months in the country - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, January 28, 2020

😱 Shocking..25 thousand child porn uploads in 5 months in the country

😱धक्कादायक..देशात 5 महिन्यात 25 हजार चाईल्ड पॉर्न अपलोड

अमेरिकेने चाईल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित एक धक्कादायक आकडेवारी भारताला दिली आहे. भारतासोबत शेअर केलेल्या अहवालानुसार गेल्या 5 महिन्यांत 25 हजाराहून अधिक चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओ भारतातील वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले गेले आहेत. नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लोइटेड चिल्ड्रन ऑफ अमेरिकाने (NCMEC) हा डेटा राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो ऑफ इंडियाला दिला आहे. हा डेटा शेअर करण्यासाठी भारत आणि अमेरिकेने मागील वर्षी करार केला होता.

दिल्लीत सगळ्यात जास्त प्रकरणे..
चाईल्ड पोर्नोग्राफीचे सर्वाधिक प्रकरणे राजधानी दिल्लीची आहेत. यानंतर महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये बाल लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले जातात. प्रत्येक राज्यातील आकडेवारी स्वतंत्रपणे समोर आलेली नाही, परंतु महाराष्ट्रात एकूण 1700 प्रकरणे उघडकीस आली आहेत.

गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत..
देशभरात वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकांना चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधित अटक करण्यात आली आहे. याचसंदर्भात गेल्या वर्षी NCMECशी करार करण्यात आला होता. 23 जानेवारीपर्यंत गेल्या पाच महिन्यांत अशी 25 हजार प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, हा डेटा प्रथमच समोर आला आहे.

एकट्या मुंबईत 500 प्रकरणे..
गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 7 प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांमध्ये सर्वात जास्त प्रकरणे उघडकीस आली आली. मुंबईमध्ये गेल्या 5 महिन्यात 500 प्रकरणे समोर आली आहेत. तर, दिल्ली, गुजरात आणि केरळमध्येही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.

कसे ठरवले जाते चाइल्ड पोर्नोग्राफी आहे की नाही..
ही माहिती जमवण्यासाठी इंटरनेट सेवा देणाऱ्यांपासून ते विविध सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. यात नग्नता आणि मुलांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून या व्हिडीओची तपासणी केली जाते. बाल पोर्नोग्राफी अंतर्गत मुलांच्या संरक्षणासाठी पॉक्सो कायदा लागू करण्यात आला आहे. यात लहान मुलांचे फोटो, व्हिडिओ, डिजिटल किंवा संगणक-निर्मित प्रतिमा जी वास्तविक मुलांसारखी दिसत आहे, यांचा समावेश होतो.

Post Bottom Ad

#

Pages