😱 धक्कादायक प्रकार उघडकीस..खून करून आरोपी पोलिसात दाखल झाला नाही तर चक्क 19 वर्षांपासून कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, February 4, 2020

😱 धक्कादायक प्रकार उघडकीस..खून करून आरोपी पोलिसात दाखल झाला नाही तर चक्क 19 वर्षांपासून कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत..

😱 धक्कादायक प्रकार उघडकीस..खून करून आरोपी पोलिसात दाखल झाला नाही तर चक्क 19 वर्षांपासून कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत..

एक व्यक्ती कोणाचा तरी खून करतो आणि आपले गुन्हे लपवण्यासाठी पोलीस बनतो. ही कोणत्या सिनेमाची कहानी नाही तर खरी गोष्ट आहे. उत्तर प्रदेशच्या बरेली येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला, ज्यामुळं सर्वांच्या पायाची खाली जमीन सरकली.

बरेली येथील 22 वर्षांच्या खून प्रकरणातील एक आरोपी फक्त उत्तराखंड पोलिसात दाखल झाला नाही तर 19 वर्षांपासून कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. बरेली येथील कोर्टाने जेव्हा या पोलिसाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तेव्हा पोलिसांमध्ये खळबळ उडाली. मुकेश कुमार असे आरोपीचे नाव असून तो सध्या अल्मोडा पोलिसात हवालदारम्हणून तैनात आहे. आता मुकेश याच्याविरूद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पंतनगर एसएचओने दिली.

2001मध्ये उत्तराखंड पोलिसात दाखल होताना मुकेश कुमारने स्वत:ला उत्तराखंडमधील उधमसिंहनगर येथील रहिवासी असल्याचे सांगितले. आता या पोलिसाविरूद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधीक्षक उधमसिंह नगर यांच्या कार्यालयात तैनात ज्येष्ठ कारकून जोधसिंग तोमाक्याल यांनी फसवणूकीचा रिपोर्ट दाखल केला आहे.
या रिपोर्टनुसार, 2001मध्ये बरेलीच्या अभयपूर पोलीस स्थानकात मुकेश कुमार यांना उत्तराखंड पोलिसात दाखल झाले. मात्र नुकतेच नरेश कुमार नावाच्या व्यक्तीने एसएसपी अल्मोडाला यांना खबर दिली की, 1997 मध्ये बरेली येथे झालेल्या एका हत्येमध्ये मुकेश कुमारचा सहभाग होता आणि या प्रकरणात तेथील कोर्टाने त्याला पाच जणांसह जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Post Bottom Ad

#

Pages