🚨 दहशद निर्माण करण्यासाठी रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या 2 आरोपीना पोलीसांनी केली अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, February 4, 2020

🚨 दहशद निर्माण करण्यासाठी रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या 2 आरोपीना पोलीसांनी केली अटक..

🚨 दहशद निर्माण करण्यासाठी रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या 2 आरोपीना पोलीसांनी केली अटक..
भारती विदयापीठ पोलीस स्टेशनच्या हददीत पोलीस उपनिरिक्षक श्री.भुषण कोते व तपास पथकातील कर्मचारी श्री.सर्फराज देशमुख, श्री.राहुल ताबे पेट्रोलिंग करित असतांना माहिती मिळाली की, संतोषनगर येथे राहणारे संशयित इसम यांच्याकडे एक गावठी पिस्टल असून हे संतोषनगर येथे मैदानात उभे आहेत. या मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याठिकाणी सापळा रचुन दोन संशयित आरोपीस ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली असता सलीम नदाफ याच्या पॅन्टच्या डाव्या खिशात एक जिवंत काडतुस व जलील शेख याच्या कमरेच्या पॅन्टच्या आत खोचलेले गावठी देशी बनावटीचे पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे.

रिव्हॉल्व्हर व जीवंत काडतूस बाळगणारे आरोपी जलील रोफ शेख (वय ३५, रा.संतोषनगर,भगवा चौक,कात्रज,पुणे), सलीम ईस्माईल नदाफ (वय ३०, रा.संतोषनगर शारदा कॉलनी,कात्रज,पुणे) यांना ताब्यात घेत भारती विदयापीठ पोलीस स्टेशनमध्ये गु.र.न. १५०/२०२० भारतीय हत्याराचा कायदा कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.वंसत कुवर यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हददीत पोलीस उपनिरिक्षक श्री.भुषण कोते व तपास पथकातील कर्मचारी श्री.सर्फराज देशमुख, श्री.राहुल ताबे पेट्रोलिंग करित असतांना यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, संतोषनगर येथे राहणाऱ्या दोन संशयित इसम यांच्याकडे एक गावठी पिस्टल असून हे संतोषनगर येथे मैदानात उभे आहेत. ही माहिती मिळताच त्वरित ही माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.वसंत कुवर, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.विष्णु ताम्हाणे यांना कळवत त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक श्री.भुषण कोते, पोलीस उपनिरीक्षक श्री.महेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी श्री.कृष्णा बढे, श्री.कुंदन शिदे, श्री.सर्फराज देशमुख, श्री.राहुल तांबे, श्री.सचिन पवार, श्री.अभिजीत जाधव, श्री.गणेश चिचंकर, श्री.अभिजीत रत्नपारखी, श्री.महेश मंडलीक यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी सापळा रचुन संशयित आरोपी जलील रोफ शेख (वय ३५, रा.संतोषनगर,भगवा चौक,कात्रज,पुणे), सलीम ईस्माईल नदाफ (वय ३०, रा.संतोषनगर शारदा कॉलनी,कात्रज,पुणे) यास ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली असता सलीम नदाफ याच्या पॅन्टच्या डाव्या खिशात एक जिवंत काडतुस व जलील शेख याच्या कमरेच्या पॅन्टच्या आत खोचलेले गावठी देशी बनावटीचे पिस्टल हस्तगत करत भारती विदयापीठ पोलीस स्टेशनमध्ये गु.र.न. १५०/२०२० भारतीय हत्याराचा कायदा कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. आरोपी यांनी अग्नीशस्त्राचा वापर कोठे केला आहे का ? कोठुन आणले ? याबाबत भारती विदयापीठ पोलीस पुढील तपास करत आहे.

सदर कामगिरी,
अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री.डॉ.संजय शिंदे, परिमंडळ २ पुणे शहर पोलीस उपायुक्त श्री.शिरीष सरदेशपांडे, सहा.पोलीस आयुक्त श्री.सर्जेराव बाबर, भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.वंसत कुवर, पोलीस
निरीक्षक गुन्हे शाखा श्री.विष्णु ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचने प्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री.भुषण कोते, पोलीस उपनिरीक्षक श्री.महेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी श्री.कृष्णा बढे, श्री.कुंदन शिदे, श्री.सर्फराज देशमुख, श्री.राहुल तांबे, श्री.सचिन पवार, श्री.अभिजीत जाधव, श्री.गणेश चिचंकर, श्री.अभिजीत रत्नपारखी, श्री.महेश मंडलीक यांनी केलेली आहे.

Post Bottom Ad

#

Pages