पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची 2019 मध्ये सर्वाधिक 184 कारवाया मात्र दोषसिद्धीचे प्रमाण खुपच कमी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, February 19, 2020

पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची 2019 मध्ये सर्वाधिक 184 कारवाया मात्र दोषसिद्धीचे प्रमाण खुपच कमी..

पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची 2019 मध्ये सर्वाधिक 184 कारवाया मात्र दोषसिद्धीचे प्रमाण खुपच कमी..

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वाधिक कारवाया पुणे विभागात केल्या आहेत. सन 2019 मध्ये तब्बल 184 सापळा रचून कारवाया करण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक कारवाई पोलिसांवर (51) तर, त्याखालोखाल महसूल विभागावर (42) केली आहे. पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. यातील 184 सापळ्यांपैकी एकट्या पुणे जिल्ह्यात 65 सापळे रचण्यात आले आहेत. मात्र, दोषसिद्धीचे प्रमाण खुपच कमी आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

ऍन्टी करप्शन ब्युरोच्या पुणे विभागाच्यावतीने सन 2019 मध्ये केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्री.राजेश बनसोडे यांनी ही माहिती दिली.
बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये सर्वाधिक 184 कारवाया पुणे विभागात करण्यात आल्या आहेत. देशातील सर्वांत जास्त कारवाई महाराष्ट्रात तर, महाराष्ट्रातील सर्वाधिक कारवाई पुणे विभागात करण्यात आली आहे.

सन 2020 मध्ये आजपर्यंत एकूण 28 सापळा कारवाई झालेल्या असून 2019 मध्ये झालेल्या सापळा कारवाईची तुलना करता त्यामध्ये 4 पट वाढ झाली आहे. यामुळे राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे विभागास बेस्ट रेंज रिवॉर्ड देऊन गौरविले आहे. सन 2019 मध्ये केलेल्या 184 सापळा कारवाईमध्ये 261 आरोपींना पकडले.

त्यामध्ये वर्ग एकचे 11, वर्ग दोनचे 18, वर्ग तीनचे 158, वर्ग चारचे 15 आरोपी लोकसेवक व इतर लोकसेवक 13 व खासगी 46 व्यक्‍तींचा समावेश आहे. सापळा कारवाईत झालेल्या सर्व वर्ग एक व दोनच्या आरोपी लोकसेवकांच्या मालमत्तेची उघड चौकशी अनिवार्य आहे. इतरांच्या बाबतीत गुणवत्तेनुसार निर्णय घेण्यात येतो.

जनजागृती मोहिमेला प्रतिसाद..
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येणाऱ्या जनजागृतीमुळे बरेच नागरिक टोल फ्री क्रमांक 1064 यावर कॉल करून ब्युरोबाबतची माहिती जाणून घेतात. सन 2019 मध्ये 1099 कॉल प्राप्त झाले होते. प्राप्त झालेल्या कॉलवरून 17 यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली.

Post Bottom Ad

#

Pages