महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस बिबवेवाडी पोलिसांनी 4 तासात केले जेल बंद.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, February 15, 2020

महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस बिबवेवाडी पोलिसांनी 4 तासात केले जेल बंद..

✍🏻 भूषण गरुड

🚨 महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस बिबवेवाडी पोलिसांनी 4 तासात केले जेल बंद..

महिलांच्या बाबतीत अत्याचाराच्या घटना घडत असताना बिबवेवाडी परिसरात शुक्रवारी पहाटे पिडीत महिला तिच्या मुलांसह घरामध्ये झोपलेली असताना पिडीतेच्या शेजारी राहणारा 30 वर्षीय तरुणाने घराचे दार उघडुन पिडीत महिलेच्या अंगाशी लगट करत महिलेच्या अंगावरील ड्रेस फाडून टाकत महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याघटने बाबत पिडीत महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत शोध घेत आरोपीस अटक करून चार तासात गुन्ह्याचा पुढील तपास करत गुन्हयाचे दोषारोपपत्र मा.न्यायालयात सादर केले असता मा.न्यायालयाने आरोपीची येरवडा जेलमध्ये रवानगी केली आहे.

महिलेचा विनयभंग करणारा आरोपी अविनाश सावंत (वय 30)असे नाव असून त्याच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं.77/2020 भां.द.वि.क.354,354(ब),452 प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
शुक्रवार दि.14 फेब्रुवार 2020 रोजी पहटे 06/00 वा.सुमारास यातील पिडीत महिला तिच्या मुलांसह घरामध्ये झोपलेली असताना पिडीतेच्या शेजारी राहणारा आरोपी अविनाश सावंत (वय 30) याने घराचे दार उघडुन पिडीत महिलेच्या अंगाशी लगट करु लागल्याने पिडीतेने त्यास विरोध केला असता आरोपीने पिडीत महिलेच्या अंगावरील ड्रेस फाडून टाकला असता पिडीत महिला आरडा-ओरडा केल्याने आरोपी तेथुन पळुन गेला. या घटनेनंतर पिडीत महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी अविनाश सावंत याच्या विरुध्द तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीची दखल घेत विनयभंग केलेल्या आरोपीच्या विरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं.77/2020 भां.द.वि.क.354,354(ब),452 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित फिर्यादीने दिलेल्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.कुमार घाडगे यांनी आरोपीचा शोध घेत अटक करण्याच्या दिलेल्या आदेशानुसार बिबवेवाडी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री.अतुल थोरात, पोलीस हवालदार श्री.रवी चिप्पा, पोलीस नाईक दुधाने,पोलीस शिपाई लोखंडे यांनी विनयभंग करणाऱ्या आरोपीचा शोध घेत अटक करत गुन्ह्याचा पुढील तपास करून गुन्हयाचे दोषारोपत्रासह 4 तासात मा.न्यायालयात दाखल केले असता मा.न्यायालयाने आरोपीची येरवडा जेल येथे रवानगी केली आहे तसेच मा.न्यायालयाला केस तात्काळ सुरु करण्याबाबत बिबवेवाडी पोलिसांनी विनंती केली असता माननीय न्यायालयाने विनंती मान्य केली आहे.

सदरची कामगिरी,
बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शना नुसार व सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक श्री.अतुल थोरात, पोलीस हवालदार श्री.रवी चिप्पा, पोलीस नाईक श्री.दुधाने व पोलीस शिपाई श्री.लोखंडे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages