😱 धक्कादायक..पुणे स्टेशन परिसरात रेल्वेची साफसफाई करतांना एके 47 रायफलची 7 जीवंत काडतुसे व 4 बुलेट्स सापडल्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, February 5, 2020

😱 धक्कादायक..पुणे स्टेशन परिसरात रेल्वेची साफसफाई करतांना एके 47 रायफलची 7 जीवंत काडतुसे व 4 बुलेट्स सापडल्या..

😱 धक्कादायक..पुणे स्टेशन परिसरात रेल्वेची साफसफाई करतांना एके 47 रायफलची 7 जीवंत काडतुसे व 4 बुलेट्स सापडल्या..

आझाद हिंद एक्सप्रेसच्या बोगीतील स्वच्छतागृहात एके- 47 रायफलची 7 जीवंत काडतुसे आणि 4 बुलेट्स सापडल्याने एकच खळबळ उडाली.  पुणे स्टेशन परिसरातील घोरपडी यार्ड येथे रेल्वेची साफसफाई करीत असताना हा प्रकार उघडकीस आला.

कोलकाता ते पुणे स्टेशन या दरम्यान आझाद हिंद एक्सप्रेस धावते. कोलकाता येथून आलेली आझाद हिंद एक्सप्रेस घोरपडी यार्ड येथे साफसफाईसाठी लावण्यात आली होती. यावेळी बोगी क्र. एस 2 मधील स्वच्छतागृहाच्या डस्टबीनमध्ये एके 47 रायफलचे 7 जीवंत काडतुसे आणि इतर 4 बुलेटस कर्मचाऱयांना आढळल्या. स्वच्छता विभागाच्या व्यवस्थापकाने याची माहिती रेल्वे पोलीस फोर्स आरपीएफला दिली. त्यानंतर पुणे विभागाच्या लोहमार्ग पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आझाद हिंद एक्सप्रेसच्या बोगीत सापडलेले जीवंत 11 काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पुणे लोहमार्ग पोलीस करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages