🕍 पुणे महापालिकेचे करोना व्हायरसच्या जनजागृती विषयी 50 हजार पोस्टर्स.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, February 4, 2020

🕍 पुणे महापालिकेचे करोना व्हायरसच्या जनजागृती विषयी 50 हजार पोस्टर्स..

🕍 पुणे महापालिकेचे करोना व्हायरसच्या जनजागृती विषयी 50 हजार पोस्टर्स..
करोना व्हायरसने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आणीबाणी जाहीर झाली आहे. भारतातही त्याचा प्रसार होण्याची शक्‍यता असल्याने महापालिकेने त्यासंबधी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी भयभीत होऊ नये आणि योग्य त्या उपाययोजना कराव्यात यासाठी ही जनजागृती करण्यात येणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून करोना व्हायरस संदर्भात मोठ्या प्रमाणात मेसेज “व्हायरल’ होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये या रोगासंदर्भात संभ्रम निर्माण होऊन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी महापालिकेने पाऊल उचलले असून, हे भय दूर करण्यासाठी आणि लागण होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी 50 हजार पोस्टर लावण्यात येणार असल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ.संजीव वावरे यांनी दिली.

चीनमध्ये सध्या करोना व्हायरसने उच्छाद मांडला आहे. या आजाराने तेथे शेकडोंचे बळी घेतले आहे. तशीच लक्षणे आढळलेला एक रुग्ण भारतात केरळमध्ये आढळला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. त्यात सोशल मीडियावर विविध मेसेज आणि व्हिडिओ व्हायलर होत असल्याने नागरिकांत गैरसमज निर्माण होत आहेत. तसेच, काहींनी स्वत:हून उपाययोजना सांगण्याला, पसरवायला सुरुवात केली आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी पोस्टर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 5 प्रकारचे पोस्टर तयार करण्यात आले आहेत. या पोस्टरवर करोनाची लक्षणे, त्या संबंधी घ्यावयाची दक्षता तसेच अशी लक्षणे आढळल्यास संपर्काचे नंबर देण्यात आले आहेत.

पोस्टर्स शहरातील दर्शनी भागात लावणार..
करोना व्हायरस जनजागृती पोस्टर्स शहरात दर्शनी भागात, गर्दीच्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना यासंबंधी माहिती मिळणार आहे. महापालिकेने त्यांच्या स्तरावर यासाठीची जय्यत तयारीही केली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

#

Pages