😱 पूण्यात बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी 6 लाख 24 हजार रुपयांचा ऐवज नेला चोरून.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, February 5, 2020

😱 पूण्यात बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी 6 लाख 24 हजार रुपयांचा ऐवज नेला चोरून..

😱 पूण्यात बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी 6 लाख 24 हजार रुपयांचा ऐवज नेला चोरून..

पुणे शहरात कोंढवा परिसरात 23 जानेवारी ते 4 फेब्रुवारी कालावधीत उंड्रीतील लँडमार्क सोसायटी मधील बंद 3 फ्लॅट फोडून चोरट्यांनी 6 लाख 24 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याघटने प्रकरणे चंदा जाजू यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
कोंढवा परिसरात उंड्रीतील लॅन्डमार्क सोसायटीत राहणाऱ्या चंदा जाजू या गृहिणी असून त्या 23 जानेवारी ते 4 फेब्रुवारी कालावधीत मुलाकडे राहायला गेल्या असल्याने फ्लॅट बंद होता. चोरट्यांनी बंद फ्लॅट असल्याचा फायदा घेत. चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कशाच्यातरी सहाय्याने कुलूप तोडून घरातील लॅपटॉप, सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 6 लाख 24 हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. चंदा जाजू या मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2020 रोजी घरी आले असतांना फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

सदर घटने प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.डी.डी.बर्गे पुढील तपास करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages