71 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार अनिल भोसलेसह 4 जणांना मंगळवारी रात्री अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, February 26, 2020

71 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार अनिल भोसलेसह 4 जणांना मंगळवारी रात्री अटक..

71 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार अनिल भोसलेसह 4 जणांना मंगळवारी रात्री अटक..

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी बॅंकेचे संचालक व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधानपरिषदेमधील आमदार अनिल भोसले यांसह 4 जणांना मंगळवारी रात्री पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अनिल भोसले, सूर्याजी जाधव, कैलास भोसले आणि तानाजी पडवळ यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर 71 कोटींचा आर्थिक घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान आज त्यांना शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केले जाईल. या प्रकरणामध्ये अनिल भोसले यांच्यासोबत 11 जणांच्या विरोधात ठेवीदारांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरबीआय बॅंकेकडून 2018-19 मध्ये करण्यात आलेल्या ऑडिटनुसार, या बॅंकेमध्ये 71 कोटींचा घोटाळा झाल्याची बाबा समोर आली आहे. सध्या या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सुरू आहे. बॅंकेच्या 11 पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. CA योगेश लकडे यांनी या घोटाळ्याबाबत शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. अनिल भोसले यांच्यासह 11 जणांनी बँकेच्या रेकॉर्डमध्ये खोट्या नोंदी दाखवल्याची बाब बॅंकेच्या ऑडिट मध्ये समोर आली आहे.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या एकूण 14 शाखा आहेत. तर या बॅंकेचे 16 हजार खातेदार आहेत. बँकेकडून मागील काही दिवसांमध्ये 12 कोटी रुपयांची कर्ज वसुली करण्यात आली आहे. आरबीआयने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर बँकिंग रेग्युलेशन कलम 1949चे पोट-कलम (1) चे कलम 35A अन्वये ही बंधने घातली होती. त्यानुसार खातेदारांना पैसे काढण्यावर बंधनं घालण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी सरकारकडून झालेल्या चौकशीत या बँकेने तब्बल 300 कोटींचे अनियमित कर्ज वाटप केल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर आरबीआयने घातलेल्या निर्बंधांनुसार बँकेच्या ग्राहकांना केवळ एक हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली होती.

Post Bottom Ad

#

Pages