🚨 कोंढवामध्ये बँक ऑफ बडोदा बँकेचे ATM मशीन फोडणाऱ्या आरोपीना अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, February 11, 2020

🚨 कोंढवामध्ये बँक ऑफ बडोदा बँकेचे ATM मशीन फोडणाऱ्या आरोपीना अटक..

🚨 कोंढवामध्ये बँक ऑफ बडोदा बँकेचे ATM मशीन फोडणाऱ्या आरोपीना अटक..

✍🏻 भूषण गरुड : बँक ऑफ बडोदा बँकेच्या ATM केंद्रामध्ये जाऊन एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी पहाटे २.५० वाजता सिंहगड कॉलेज समोर,कोंढवा, येवलेवडी येथील बँक ऑफ बडोदा बँकेच्या ATM केंद्रामध्ये घडली आहे. 

ATM मशीन फोडणारे आरोपी..
१) रिमेश्वर बळीरा देशमुख (वय २४,रा.देशमुख टाकळी,ता.परळी,जि.बिड),
२) श्रीराम विकावन हनुवते (वय २७,रा.चिखली निगडी) यांच्या विरुद्ध गु.र.क्र.१४०/२०२० भा.द.वी.कलम ३८०,५११,४२७ प्रमाणे कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
कोंढवा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले तपास पथकाचे पोलीस सोमवारी पहाटे २.५० वाजण्याच्या सुमारास ते आपल्या सहकाऱ्यासह कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी कोंढवा सिंहगड कॉलेज समोर,येवलेवडी येथील बँक ऑफ बडोदा बँकेच्या ATM सेंटर मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची नियंत्रण कक्ष येथून माहिती प्राप्त होताच. ही प्राप्त माहिती मा.सहा.पोलीस आयुक्त,वानवडी विभाग.पुणे शहर श्री.सुनील कलगुटकर, मा.कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, मा.कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा श्री.महादेव कुंभार यांना कळवत त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकाचे पोलीस शिपाई अझीम शेख, पोलीस शिपाई मोहन मिसाळ, पोलीस हवलदार योगेश कुंभार, खडी मशीन मार्शल पोलीस शिपाई सागर सूर्यवंशी, पोलीस नाईक अर्जुन पवार व रात्र गस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत एटीएम केंद्रामध्ये १) रिमेश्वर बळीरा देशमुख (वय २४,रा.देशमुख टाकळी,ता.परळी,जि.बिड),२) श्रीराम विकावन हनुवते (वय २७,रा.चिखली निगडी) हे दोघेजण संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली असता आरोपी चोरीच्या उद्देशाने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरी करण्याचे साहित्या व मोटर सायकल हस्तगत करत आरोपीच्या विरुद्ध गु.र.क्र.१४०/२०२० भा.द.वी.कलम ३८०,५११,४२७ प्रमाणे कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीना अटक केली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.

सदरची कामगीरी,
मा.श्री.सुनिल फुलारी सो.अपर पोलीस आयुक्त,पु.प्रा.वि.पुणे,
मा.श्री.सुहास बावचे सो.पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5,
मा.श्री.सुनील कलगुटकर सो.सहा.पोलीस आयुक्त,वानवडी विभाग.पुणे,
मा.श्री.विनायक गायकवाड सो.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो.कोंढवा पोलीस ठाणे,
मा.श्री.महादेव कुंभार सो.पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे कोंढवा पोलीस ठाण्याचे रात्र गस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री.निलेश चव्हाण, तपास पथकातील पोलीस शिपाई श्री.अझीम शेख, पोलीस शिपाई श्री.मोहन मिसाळ, पोलीस हवलदार श्री.योगेश कुंभार, खडी मशीन मार्शल पोलीस शिपाई श्री.सागर सूर्यवंशी, पोलीस नाईक श्री.अर्जुन पवार यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages