🚨 Tandipar accused arrested by Kondhwa police - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, February 1, 2020

🚨 Tandipar accused arrested by Kondhwa police

🚨 तडीपार आरोपीस कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद..

पुणे शहरासह जिल्ह्यातून 12 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलेल्या एका सराईत आरोपीला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही कारवाई शनिवारी दि.1 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री 2:30 वा.सुमारास धर्मावत पेट्रोल पंपाच्या मागे,पद्मावती नगर,पिसोळी,कोंढवा,पुणे येथे करण्यात आली.

अनिल सतपाल रजपूत (वय 33, रा. बालाजी-पद्मावती नगर,तालुका हवेली,जिल्हा पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
अनिल सतपाल रजपूत हा सराईत आरोपी आहे. कोंढवा पोलिसांनी त्याला 11 ऑक्टोबर 2019 रोजी मा पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक 19/2019 मुंबई पोलीस ऍक्ट कलम 56 (1)(ब) अन्वय प्रमाणे पुणे शहर व जिल्ह्यातून 12 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र शनिवारी दि.1 फेब्रुवारी 2020 रोजी रात्रीच्या सुमारास अनिल रजपूत हा पुन्हा पद्मावती नगर, पिसोळी, कोंढवा येथे आल्याची माहिती कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष नाईक, पोलीस नाईक अमित साळुंखे, पोलीस शिपाई आदर्श चव्हाण यांना मिळताच त्यांनी ही माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना कळवत त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, पोलीस हवालदार संतोष नाईक, पोलीस नाईक अमित साळुंखे, पोलीस शिपाई आदर्श चव्हाण यांनी तातडीने मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याठिकाणी सापळा रचून अनिल रजपूत याला अटक केली. त्याच्यावर तडीपारीचा आदेश भंग केल्या प्रकरणी कलम १४२ अनुसार कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी,
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दादाराजे पवार, पोलीस हवालदार श्री.संतोष नाईक, पोलीस नाईक श्री.अमित साळुंखे, पोलीस शिपाई श्री.आदर्श चव्हाण यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages