😱 नगरच्या जेलमधून पाच खतरनाक गुन्हेगारांचे पलायन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, February 10, 2020

😱 नगरच्या जेलमधून पाच खतरनाक गुन्हेगारांचे पलायन..

✍🏻 भूषण गरुड

😱 नगरच्या जेलमधून पाच खतरनाक गुन्हेगारांचे पलायन..
हत्या आणि खुनाचे आरोप असलेल्या 5 अट्टल गुन्हेगार तुरुंगातून पळाल्याची खळबळजनक घटना घडलीय. कर्जतच्या उपकारागृहातून हे 5 कैदी रविवारी सायंकाळी 7:30 वा. पसार झाले. जेलच्या छताची कौल काढून आणि छत फोडून हे आरोपी पसार झालेत. या आरोपींवर 302 सारखे आरोप होती. अट्टल गुन्हेगार असलेले आरोपी पळाल्याने सुरक्षा व्यवस्थेचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

पसार झालेले आरोपी..
रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
1) ज्ञानदेव कोल्हे (नानज जवळा, ता. जामखेड)
2) अक्षय राऊत (पारेवाडी, अरणगाव)
3) मोहन भोरे (कवडगाव, ता. जामखेड)
4) चंद्रकांत राऊत (पारेवाडी, ता. जामखेड)
5) गंगाधर जगताप (महाळगी, ता. कर्जत) अशी पळालेल्या आरोपींची नावे आहेत. कर्जत पोलीस स्टेशनच्या जेलमधील कस्टडी क्रमांक तीन येथे हे पाच आरोपी होते.

आरोपींनी केलेले गुन्हे..
पसारांमध्ये ज्ञानेश्वर कोल्हे जामखेड तालुक्यातील असून पिस्तूल आणि त्याची विक्री करणे यासह अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे.
अक्षय रामदास राऊत व चंद्रकांत महादेव राऊत दोन्ही आरोपी मुंबईतील टरबूज व्यापाऱ्याच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटकेत होते,
गंगाधर जगताप कर्जत तालुक्यातील आरोपी बलात्कार आणि  खुनाच्या गुन्ह्यांमध्ये होता,
मोहन कुंडलीक भोरे जामखेड तालुक्यातील असून खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटकेत होता, हे सर्व आरोपी एकाच कस्टडीमध्ये ठेवले होते.

फरार आरोपींच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या आरोपींना पुन्हा ताब्यात घेणं आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणं याला प्राधान्य असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.

Post Bottom Ad

#

Pages