😱 धक्कादायक..बिबवेवाडीत एका इसमाने वाहतुक सहाय्यक फौजदारासोबत शिवीगाळी करत केली धक्काबुक्की.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, February 11, 2020

😱 धक्कादायक..बिबवेवाडीत एका इसमाने वाहतुक सहाय्यक फौजदारासोबत शिवीगाळी करत केली धक्काबुक्की..

😱 धक्कादायक..बिबवेवाडीत एका इसमाने वाहतुक सहाय्यक फौजदारासोबत शिवीगाळी करत केली धक्काबुक्की..

✍🏻 भूषण गरुड : बिबवेवाडीत तृप्ती हॉटेलच्या समोरील रोडवर डबल पाकींग वाहतुकीस अडथळा होईल अशा पध्दतीने लावलेल्या टु व्हीलर कारवाई करत गाडयांचे फोटो काढुन टेम्पोवरील हेल्पर कर्मचारी यांच्या मदतीने गाडया उचलून टेम्पोमध्ये भरत असतांना एका इसमाने सहाय्यक फौजदारासोबत शिवीगाळी करत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना दि.०९ फेब्रुवारी २०२० रोजी १७.३० वा. सुमारास घडली आहे.या घटनेप्रकरणी सहायक फौजदार एस. पी. मोरे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या धक्कादायक घटने प्रकरणी आरोपी बापू साबळे (रा. चैत्रबन वसाहत, बिबवेवाडी) याच्या विरुद्ध गु.र.नं.व.कलम २०२० भा.द.वि.कलम ३७३,३३२,३२३,७०५, मो.वा.का.क,२२(ए)/१०७ प्रमाणे बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये रविवार दि.०९ फेब्रुवारी २०२० रोजी सुमारे १७.३० वा. सुमारास तृप्ती हॉटेलच्या समोरील रोडवर डबल पाकींग वाहतुकीस अडथळा होईल अशा पध्दतीने लावलेल्या टु व्हीलर गाडयांचे फोटो काढुन टेम्पोवरील हेल्पर कर्मचारी यांच्या मदतीने गाडया उचलून टेम्पोमध्ये भरत असतांना आरोपी बापु साबळे (रा. चैत्रबन वसाहत,बिबवेवाडी,पुणे) याने सहाय्यक फौजदारासोबत शिवीगाळी करुन मोठ-मोठयाने आरडा - ओरडा करुन तुझी नोकरी घालवितो थांब तुला मी कोण आहे तुला माहीत नाही. तु माझी गाडी घेवुन जावु नकोस असे म्हणुन गाडी घेवून जाण्यास अटकाव करुन त्याने सहाय्यक फौजदार यांच्या शर्टची कॉलर पकडुन धक्का - बुक्की करण्याचा प्रयत्न करुन गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे.
या घटनेचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक यश बोराटे करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages