😱 पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात सुरक्षेतेची काळजी न घेतल्याने बिबवेवाडीत दोघांचा मृत्यू.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, February 13, 2020

😱 पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात सुरक्षेतेची काळजी न घेतल्याने बिबवेवाडीत दोघांचा मृत्यू..✍🏻 भूषण गरुड

😱 पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात सुरक्षेतेची काळजी न घेतल्याने बिबवेवाडीत दोघांचा मृत्यू..

पुण्यात बिबवेवाडी परिसरात पेस्ट कंट्रोलमुळे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिबवेवाडी मधील  मजली कुटुंबियांनी पेस्ट कंट्रोल केल्यानंतर पेस्ट कंट्रोल ज्यांच्याकडुन करुन घेतले होते त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे कुठल्याही प्रकारची सुरक्षेतेची काळजी न घेता घरात कुटुंबातील दोघे टिव्ही पाहत बसले असतांना चक्कर येऊन बेशुध्द झाल्याने यात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

महीला सौ.अपर्णा अविनाश मजली (वय ५४) व अविनाश सदाशिव मजली (वय ६४, रा.गणेश विहार,बिबवेवाडी,पुणे) यांचा पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात सुरक्षेतेची काळजी न घेतल्याने मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
महीला सौ.अपर्णा अविनाश मजली (वय ५४) व अविनाश सदाशिव मजली (वय ६४, रा.गणेश विहार,बिबवेवाडी,पुणे) यांनी त्यांच्या राहते घरात दि.११ फेब्रुवारी २०२० रोजी पेस्ट कंट्रोल केलं होतं. घरात पेस्ट कंट्रोल ज्यांच्याकडुन करुन घेतले होते त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे कुठल्याही प्रकारची सुरक्षेतेची काळजी न घेता घराची दारे खिडक्या उघडुन न ठेवता तसेच फॅन चालु न करता घरात दोघे टिव्ही पाहत बसले असतांना मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ०७.१५ वा.सुमारास त्यांना चक्कर येऊन दोघेही बेशुध्द झाल्याने त्यांची मुलगी श्रावणी मजली यांनी दोघांना सहयाद्री हॉस्पिटल येथे उपचाराकामी नेले असता डॉक्टरांनी तपासणी करण्यापूर्वीच मयत झाल्याचे सांगीतले. पण आपल्या घरातल्यानां अशा पद्धतीने गमावल्याने मजली कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळलाय. घरातील व्यक्तीच्यां अशा अकाली जाण्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, यासंदर्भात बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक आर.एस.उसगावकर करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages