पुणेकरांसाठी मोफत अपघात विमा योजना.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, February 28, 2020

पुणेकरांसाठी मोफत अपघात विमा योजना..

पुणेकरांसाठी मोफत अपघात विमा योजना..
पुणे महापालिकेच्यावतीने नागरिकांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना मोफत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत संबंधित व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबियाला 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.
पुणे शहरातील निवासी मिळकत कर आणि गलिच्छ वस्ती निर्मूलन सेवा कर भरणारा प्रत्येक नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या मदतीने योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने ही विमा योजना सुरू झाली आहे.
आई-वडील, पत्नी आणि 23 वर्षे वयाच्या आतील मुले आदींचा समावेश करण्यात आलेला आहे. अपघातात अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये आणि आई-वडील किंवा 23 वर्षाच्या आतील मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख 50 हजार रुपयांची विमा रक्कम दिली जाते.
याशिवाय अपघात झाल्यास.. औषधोपचारासाठी 1 लाख रुपये आणि रुग्णवाहिकेसाठी 3 हजार रुपये देण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मागील आर्थिक वर्षाचा (2018-19) मिळकत कर भरलेला असणे अनिवार्य आहे.
योजनेचे निकष :-
लाभार्थी मिळकतकरधारक असणे बंधनकारक
गलिच्छ वस्ती निर्मूलन सेवा शुल्क भरणारे नागरिकही पात्र
मागील आर्थिक वर्षाचा मिळकत कर भरलेला असावा
अपघात हा 1 एप्रिल 2019 ते 28 मे 2020 या कालावधीतील असावा
योजना फक्त अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वासाठी मर्यादित
नैसर्गिक किंवा आजारपणाने मृत्यू झालेल्यांना लाभ मिळत नाही.

Post Bottom Ad

#

Pages