🚨 पुण्यात अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, February 10, 2020

🚨 पुण्यात अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक..

✍🏻 भूषण गरुड

🚨 पुण्यात अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक..
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तर काही दिवसांपूर्वी हिंगणघाट येथील तरुणीला भररस्त्यात जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त करत आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात असतांना पुणे येथे एका तरुणीला अ‍ॅसिडटाकण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने लैंगिक अत्याचार करत पीडित तरुणीचा व्हिडिओ सुद्धा शूट केल्याची बाब उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पीडित तरुणी कोरेगार पार्क येथील एका शाळेत शिकते. तर आरोपी या तरुणीचा गेल्या काही दिवसांपासून पाठलाग करत तिला त्रास देत होता. याच दरम्यान आरोपीने विद्यार्थिनीला तुझ्या घरातील व्यक्तींची हत्या करीन आणि तुझ्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकीन अशी धमकी वारंवार देत होता. त्यानंतर पीडितेवर जबरदस्ती करत तिला वाघोली परिसरात भेटण्यास बोलावले. त्या ठिकाणी आरोपीने तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी सुद्धा त्याने दिली. दिवसेंदिवस आरोपीचा त्रास वाढत असल्याने पीडित तरुणीने थेट पालकांना याबाबत सांगितले. त्यानंतर तातडीने पालकांनी पोलिसात धाव घेत आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. तर पोलिसांकडून 25 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.

Post Bottom Ad

#

Pages