रिक्षात विसरलेली दागिन्यांची बॅग मार्केटयार्ड पोलिसांमुळे मिळाली परत.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, February 18, 2020

रिक्षात विसरलेली दागिन्यांची बॅग मार्केटयार्ड पोलिसांमुळे मिळाली परत..

👌रिक्षात विसरलेली दागिन्यांची बॅग मार्केटयार्ड पोलिसांमुळे मिळाली परत..
पुणे शहर मार्केटयार्ड परिसरात ५० वर्षीय महिला रविवार (दि.16) रोजी मांढरदेवीचे देवदर्शन करून घरी परतत असतांना रोख रक्कम ३०,६००/- रुपये व ४० हजार रुपये किंमतीचे सोने, ५ हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने असलेली काळ्या रंगाची बॅग रिक्षात विसरल्याची मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होताच मार्केटयार्ड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून रिक्षाचा शोध घेऊन रिक्षा चालकाकडून रिक्षात विसरलेली बॅग घेत पोलिसांनी काही तासातच प्रवासी महिलेला तीची बॅग सुखरूप परत मिळवून दिली.
पोलिसांच्या प्रयत्नातून अशाप्रकारे दागिन्यांची बॅग मिळाली परत..
मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हदीत दि.१६ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री ११.३० वा.सुमारास मांढरदेवीचे देवदर्शन करून घरी परतत असतांना महिला लक्ष्मी मोहन
पवार (वय ५०, रा. आंबेडकरनगर,मार्केटयार्ड,पुणे) यांची सोन्या-चांदीचे दागीने व रोख रक्कम असलेली काळ्या रंगाची बॅग रिक्षात विसरल्याची मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत, मला मदत करा अशी विनवणी करत असतांना त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री.सागर पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन तात्काळ स्टाफला कार्यरत करत लागलीच मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये असलेले उत्सव हॉटेल चौकातील
सी.सी.टि.व्ही फुटेज तपासुन रिक्षा क्रमांक एम.एच.१२ के.आर.१४९९ प्राप्त करून घेत हा रिक्षा क्रमांक मार्शल तसेच सर्व स्टाफला देवुन परिसरात शोध घेण्यास सांगितले असता शिवनेरी रस्त्यावर या क्रमांकाची रिक्षा मिळून आली. रिक्षा चालकाकडे बॅग बाबत चौकशी केली असता रिक्षा चालक श्री.संजय प्रकाश गाढवे (वय ४७, रा.प्रेमनगर,मार्केटयार्ड पुणे) हे पॅसेंजरने विसरलेली बॅग घेऊन मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे घेऊन चाललो असल्याचे सांगत ते मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे आले असता तक्रारदार महिला लक्ष्मी पवार यांना पोलीस स्टेशन येथे बोलावुन घेत बॅगेची ओळख पटवून सुखरूप त्यांच्याकडे सुपूर्त केली. त्या बॅगेमध्ये रोख रक्कम ३०.६००/- रुपये तसेच सोन्याचे दोन मंगळसुत्र, सोन्याच्या दोन अंगठ्या,एक सोन्याचे कानातील डुल व एक सोन्याचे
बदाम पैन्डेल असा एकुण ९ ग्रॅम वजनाचे ४० हजार रुपये किंमतीचे सोने व चांदीचे एक जोड पैजण,पायातील चार जोडवे व
एक चादीचे ब्रेसलेट असे एकुण १० ग्रॅम चांदीचे दागीने एकुण किंमत ५ हजार रुपये असलेली बॅग महिला लक्ष्मी पवार ह्यांना सुखरूप परत मिळाल्याने त्यांनी कृतज्ञता व्यक्त करून मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांचे आभार मानले.
प्रामाणिक रिक्षाचालक श्री.संजय प्रकाश गाढवे (वय ४७,रा.प्रेमनगर,मार्केटयार्ड पुणे) यांचा प्रामाणीकमुळे सोने-चांदीचे दागीने व रोख रक्कम असलेली बॅग महिलेला सुखरूप परत मिळून आल्याने मार्केटयार्ड पोलीसांकडुन प्रामाणीक रिक्षा चालक श्री.संजय गाढवे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
सदर कामगीरी,
मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ पुणे शहर श्री.सुहास बावचे,
सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री.सुनिल कलगुटकर,
मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संभाजी निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक श्री.सागर पाटील, सहाय्यक
पोलीस फौजदार श्री.मंगेश साळुके, पोलीस नाईक श्री.संदिप पोटकुले, बीट मार्शल पोलीस शिपाई श्री.उत्तम शिंदे, पोलीस शिपाई श्री.दिनकर हनमघर यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages