अवैद्य दारू विक्री करणार्‍यावर कोंढवा पोलिसांची कारवाई; दोघांना अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, February 19, 2020

अवैद्य दारू विक्री करणार्‍यावर कोंढवा पोलिसांची कारवाई; दोघांना अटक..

अवैद्य दारू विक्री करणार्‍यावर कोंढवा पोलिसांची कारवाई; दोघांना अटक..

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या बातमीच्या आधारे अवैध दारूची विक्री करणाऱ्यावर कोंढवा पोलिसांनी बुधवार (दि.१९) रोजी संध्याकाळी ७.०० वा.सुमारास कारवाई करत दोन जणांना अटक करत त्यांच्याकडून ७५० रुपये किमतीची १५ लिटर हातभट्टी दारू जप्त करून नष्ट केली.

अवैध दारू विक्री करणारे आरोपी मोहसीन दस्थगिर शेख उर्फ लालू (वय ३६, रा.शिवशंभो नगर,कोंढवा बुद्रुक,पुणे),
आरिफ जलील शेख (वय ४३, रा.शेरखान चाळ, कोंढवा बुद्रुक,पुणे) यांना पोलीसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
बुधवार (दि.१९) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोंढवा परिसरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्या कामिच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांनी आदेशित केल्यानुसार व पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक श्री.विष्णू वाडकर,पोलीस शिपाई श्री.विकास बांदल, पोलीस शिपाई श्री.आबासाहेब खाडे, पोलीस शिपाई श्री.प्रवीण डिम्बले, पोलीस नाईक श्री.हेमंत राऊत, पोलीस नाईक श्री.सागर वाघोले हे कोंढवा परिसरात आश्रफनगर गल्ली क्र. ५ याठिकाणी पायी पेट्रोलिंग करत असताना कोंढवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दादाराजे पवार यांना बातमीदाराकडून गल्ली क्र. ४ सोमनाथ नगरमधील एका बोळामध्ये एक संशयित इसम बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाताच त्या ठिकाणी छापा टाकून दारू विक्री करणारे आरोपी मोहसीन दस्थगिर शेख उर्फ लालू (वय 36, रा.शिवशंभो नगर,कोंढवा बुद्रुक,पुणे), आरिफ जलील शेख (वय 43, रा.शेरखान चाळ, कोंढवा बुद्रुक,पुणे) यास ताब्यात घेत त्यांच्याकडून 750 रुपये किमतीची 15 लिटर हातभट्टी दारू जप्त करून ती जागीच नष्ट करत कोंढवा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करत आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी,
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शन खाली व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक श्री.विष्णू वाडकर, सहायक पोलिस फौजदार श्री.म्हेत्रे, पोलीस हवालदार श्री.सोनवणे, पोलीस शिपाई श्री.विकास बांदल, पोलीस शिपाई श्री.आबासाहेब खाडे, पोलीस शिपाई श्री.प्रवीण डिम्बले, पोलीस नाईक श्री.हेमंत राऊत, पोलीस नाईक श्री.सागर वाघोले यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages