😱 बिबवेवाडीत गॅस सिलेंडरचा स्फोट एक जण जखमी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, February 8, 2020

😱 बिबवेवाडीत गॅस सिलेंडरचा स्फोट एक जण जखमी..

✍🏻 भूषण गरुड

😱 बिबवेवाडीत गॅस सिलेंडरचा स्फोट एक जण जखमी..
बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर म.न.पा हॉस्पिटल समोर क्यू-५२ या दुमजली घरांमध्ये अवैधरित्या गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवलेला होता. पहिल्या मजल्यावरील घरांमध्ये ठेवलेल्या सिलेंडर मधून वायु गळती होऊन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. शुक्रवार ७ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री ११.२०वा. सुमारास गॅस सिलेंडरच्या स्फोटाची घटना घडली आहे. राजु ऊर्फ राजाराम भवरलाल विष्णोई (वय ३४) हा तरुण गंभीररित्या भाजल्याने जखमी झाला. जखमीला पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. या घटनेप्रकरणी पोलीस नाईक शशिकांत जाधव यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

सिलेंडरचा स्फोट झाल्याने जिवित व वित्त हाणी झाल्या प्रकारणी..
१) राजु ऊर्फ राजाराम भवरलाल विष्णोई
२) घरमालक भारत ओसवाल
३) एच पी कंपनीचे संबंधीत एजन्सी मालक यांच्या विरुदध ७१/२०२० भा.दं.वि.कलम-१८८,२८५,२८७,३३८,४२०,४३६,३४ जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम-३,७, स्फोटक पदार्थ अधिनियम १८८४ कलम ०९ प्रमाणे बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस व स्थानिकांनाकडून
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार,
बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर मनपा हॉस्पिटल समोर क्यू-५२ या दुमजली घरांमध्ये राजु ऊर्फ राजाराम भवरलाल विष्णोई (वय ३४) हा भाड्याने राहत असून  तो गॅस सिलेंडरचे ने आण करण्याचे काम करत स्वताच्या फायद्याकरिता घरामध्ये गॅस सिलेंडर साठवणूक करून ठेवत व्यापारी तत्वावर चढ्या भावाने विकले जाणा-या सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरून विकत होता. शुक्रवार रोजी रात्री ११.२० वा.सुमारास पहिल्या मजल्यावरील घरात साठवणूक करून ठेवलेल्या सिलेंडर मधून वायु गळती होऊन सिलेंडरचा प्रचंड मोठा आवाज होत स्फोट झाला. गॅस सिलिंडरच्या स्फोटात घराच्या पुढील व मागील भिंत पूर्णपणे ढासळून खाली पडली आहे तसेच घराच्या आजूबाजूच्या सामाईक भिंतींना तडा जाऊन त्या निकामी झाल्या आहेत. गॅस सिलिंडरच्या स्फोटात घराला आग लागून घरातील सर्व सामान जळून खाक झाले आहे. परिणामी गॅस सिलिंडरच्या स्फोटात घराच्या दोन्ही बाजूच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. याघटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच कात्रज अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली. तसेच घरासमोर असलेल्या गाडीत ३०, तळमजल्या वरील ७, गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्या पहिल्या मजल्यावरील ६ असे एकूण अंदाजे भरलेले एच पी (निळा) व भारत गॅस कंपनीचे १९ व १४ किलो असे दोन्ही प्रकारचे ४२ सिलेंडर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
कात्रज अग्निशमन दल..
ड्रायवर - अनता जगडे, तांडेल - जयवंत तळेकर, फायरमन - संदिप घाडशी, जयेश लबडे, शिवदास खुटवड, अविनाश लांडे, धीरज जगताप, श्रीकांत वाघमोडे, शुभम शिर्के, शेखर एरफुले, शिताराम खाके (माजी तांडेल) यांनी कामगिरी केली आहे.

घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांची भेट..
दरम्यान, घटनेनंतर मा.सहाय्यक पोलीस आयुक्त वानेवाडी विभाग पुणे शहर श्री. सुनिल कलंगुटकर, बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कुमार घाडगे बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.भूषण आडके यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली असता त्याच्या निदर्शनास आले की, राजु ऊर्फ राजाराम विष्णोई हा गॅस सिलेडरचा साठा निष्काळजीपणे घरामध्ये व घराच्या बाहेर ठेवुन सिलेडरचा साठा हा जिवानाश्यक वस्तु तसेच गॅस सिलेडर हा ज्वलनशिल पदार्थ आहे हे माहित असताना देखील त्यावर कोणतेही योग्य ती सुरक्षेतेची काळजी न घेता रहिवासी भागामध्ये जिवित व वित्त हाणी होईल अश्या रितीने ज्वलनशिल गॅस सिलेडर घेवुन स्वताचे फायद्याकरिता व्यापारी तत्वावर चढ्या भावाने विकले जाणा-या सिलेंडरमध्ये गॅस भरून विकत होता. या व्यवसायाबाबत अग्निशमन दलाचा कोणताही परवाना न घेता विनापरवाना बेकायदेशीर रित्या साठा केल्याने त्या साठ्यामधील एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने जिवित व वित्त हाणी झालेली आहे. याबाबत तपास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
सदर घटनेचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री.प्रकाश वाघमारे करीत आहेत.

बिबवेवाडी पोलिसांमुळे मोठी दुर्घटना टळली.. 
गॅस सिलेंडर स्फोटाच्या प्रचंड आवाजामुळे जवळ असलेल्या अप्पर इंदिरानगर चौकीत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण आडके व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनेच्या ठिकाणी तात्काळ धाव घेत तिथे जमलेल्या गर्दीला बाजूला सारत तेथील परिसर मोकळा करत या स्फोटांमध्ये जखमी झालेल्या तरुणाला तात्काळ घराच्या बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. आग लागलेल्या घटनेची माहिती देत अग्निशमन दलाला योग्य ती उपयुक्त मदत दिल्याने तिथे असलेल्या बाकीच्या सिलेंडरने पेठ न घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

स्थानिक नागरिकांचे मोठे योगादान..
गॅस सिलेंडरचा स्फोट होताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती मात्र, जखमींना मदत करण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते त्यावेळी स्थानिक नागरिक नानु उर्फ पंकज नाईक, मनीष खोमणे, अक्षय बोरकर यांनी पोलिसांच्या मदतीने जखमीला बाहेर काढून दवाखान्यात नेले.

लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी पोहोचून केली मदत..
स्थानिक लोकप्रतिनिधी श्री.बाळासाहेब ओसवाल, नगरसेविका सौ.रुपालीताई धाडवे, यांनी घटनास्थळी दाखल होत सदर घटनेची माहिती घेत. गॅस सिलेंडरच्या स्फोटात जखमी तरुणाला आवश्यक ती मदत केली जाईल तसेच घटनेमुळे बाधित झालेल्या आजूबाजूच्या रहिवाशांना आधार देत. याघटने बाबत योग्य ती पावले उचलली जातील असे श्री.बाळासाहेब ओसवालसौ.रुपालीताई धाडवे यांनी सांगितले.

Post Bottom Ad

#

Pages